काही दिवसांपूर्वी भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या गाडीवर शिवसैनिकांनी हल्ला केला होता. या हल्ल्यात सोमय्या यांच्या कारची काच फुटली आणि सोमय्यांना जखम झाली. सोमय्यांवर झालेल्या हल्ल्यानंतर वाद आणखीच चिघळला.

तसेच सोमय्या यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी मुंबईचे माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना खार पोलिसांनी अटक केली आहे. आता या हल्ल्याप्रकरणी किरीट सोमय्या यांनी थेट दिल्लीत धाव घेतली आहे. त्यांनी केंद्रीय गृहसचिवांकडे या घटनेची चौकशी करण्याची मागणी केली.

आपल्यावर झालेल्या हल्ल्यांची चौकशी होण्यासाठी या घटनांचा तपास केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (CBI) सोपविण्यात यावा, अशी मागणी करणारी याचिका सोमय्या यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली आहे. तसेच उच्च न्यायालयाने ही याचिका दाखल देखील करून घेतली आहे.

अधिक वाचा  रस्त्यावरील नमाज पठणाबाबत योगी आदित्यनाथ यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

वाचा सविस्तर याचिकेत काय म्हंटलं आहे किरीट सोमय्या यांनी.. सोमय्या यांनी याचिकेत त्यांच्यावर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून झालेल्या हल्ल्यांच्या घटनांचा आणि पोलिसांच्या वर्तनाचा उल्लेख केला आहे. खार पोलीस स्थानकात आपल्यावरील झालेल्या हल्ल्याबाबत आपण बांद्रा पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यास गेलो होतो.

मात्र पोलिसांनी बनावट एफआयआर दाखल केला, असं सोमय्या यांनी याचिकेत म्हटलं आहे. याचबरोबर मुंबई पोलिसांकडून आपल्यावरील हल्ल्यांची चौकशी योग्य पद्धतीने होण्याची खात्री नसल्याने या हल्ल्याचा तपास सीबीआयकडे सोपवावा, असे सोमय्या यांनी याचिकेत म्हंटलं आहे.

दरम्यान, उद्धव ठाकरे, दिलीप वळसे पाटील आणि मुंबई पोलिस आयुक्त संजय पांडे खोटे एफआयआर दाखल करतात. या खोट्या एफआयआरच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात जनहित दाखल केली आहे. सोमवारी उच्च न्यायालयाला याचिकेवर तत्काळ सुनावणी घेण्याची विनंती करणार असल्याच त्यांनी सांगितलं.