मुंबई : मनी लॉण्ड्रिंग व १०० कोटींच्या वसुलीच्या आरोपाखाली न्यायालयीन कोठडीत असलेले माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची सुटका पुन्हा लांबणीवर गेली आहे. विशेष पीएमएलए कोर्टानं त्यांच्या न्यायालयीन कोठडीत आणखी १४ दिवसांची वाढ केली आहे.

राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. त्यावेळी मागली सुनावणीदरम्यान, देशमुख यांच्या सीबीआय कोठडीत वाढ करण्यात यावी, अशी विनंती सीबीआयच्यावतीने करण्यात आली होती. मात्र, विशेष सीबीआय कोर्टाने ही विनंती फेटाळली आणि देशमुख यांना २९ एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी दिली होती. आता पुन्हा एकदा आज न्यायालायने ही कोठडी १४ दिवसांपर्यंत वाढवून १३ मे पर्यंत केली आहे.

अधिक वाचा  श्रीगोंद्यात 'नंबर -वन' साठी कुरघोडी; ३ या घराण्यांमध्ये जुंपण्याची शक्यता