सोलापूर : मनसेप्रमुख राज ठाकरेंनी भोंग्यावर घेतलेल्या भूमिकेमुळे सर्वत्र वातावरण तापलं आहे. राज ठाकरे येत्या 1 तारखेला औरंगाबादला सभा घेणार आहेत.

मात्र, राज ठाकरेंची औरंगाबादची सभा उधळून लावण्याचा इशारा भीम आर्मीने दिलेला आहे. राज ठाकरेंच्या सभेसाठी पोलीस प्रशासनाने 16 अटी घालून दिलेल्या आहेत, त्याच उल्लंघन ठाकरेंकडून सभेत झालं तर या सभेमध्ये छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुलेंच्या घोषणा देऊन सभा बंद पाडू असा इशारा भीम आर्मीने दिलाय.

संपूर्ण महाराष्ट्रातून भीम आर्मीचे कार्यकर्ते हे राज ठाकरेंच्या औरंगाबादच्या सभेला जाणार असल्याच भीम आर्मीचे राष्ट्रीय महासचिव अशोक कांबळे यांनी सांगितलं आहे.

अधिक वाचा  पुणे रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म तिकिटाचे दर तिप्पट