लोकप्रिय मराठमोळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. सोनालीने आपल्या दर्जेदार अभिनयाने आणि सौंदर्याने प्रेक्षकांना भुरळ पाडली. सोनालीचा चाहतावर्गही प्रचंड मोठा आहे. मात्र सध्या सोशल मीडियावर सोनाली पुन्हा एकदा लग्न करणार असल्याच्या चर्चा आहेत. हो, हे खरं आहे. सोनाली पुन्हा एकदा लग्नबंधनात अडकण्यासाठी तयार आहे. ती पुन्हा एकदा तिचा पती कुणाल बेनोडेकर सोबत विवाहबद्ध होणार आहे. सोनालीने गेल्या वर्षी म्हणजे ७ मे २०२१ रोजी कुणालसोबत विवाहगाठ बांधली होती. आता लग्नाला एक वर्ष पूर्ण होण्याच्या निमित्ताने ती पुन्हा एकदा बोहोल्यावर चढणार आहे.

अधिक वाचा  दापोली; हर्णै समुद्र किनाऱ्यावर पुण्यातील पर्यटकांवर टोळक्यांकडून कोयत्याने वार

सोनालीने ७ मे रोजी कुणालसोबत दुबईत लग्न केलं होतं. मात्र तेव्हा करोनाचे नियम कडक असल्याने तिने लग्न अगदी साध्या पद्धतीने उरकलं होतं. आता मात्र सोनालीने धुमधडाक्यात लग्न करायचं ठरवलं आहे. सोनालीच्या जवळच्या व्यक्तीने दिलेल्या माहितीनुसार, ‘सोनालीने कुणालसोबत ७ मे ला दुबईत लग्न केलं पण तेव्हा लॉकडाउन असल्याने ती तिच्या कोणत्याही नातेवाईकांना लग्नाला बोलवू शकली नाही. सोनालीच्या घरचे मित्रपरिवार कोणीही तिथे उपस्थित नव्हतं. त्यांनी व्हिडीओ कॉल करत सगळ्यांचे आशीर्वाद घेतले होते. त्यामुळेच सोनाली पुन्हा एकदा लग्न करत आहे. आता लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाच्या दिवशी सोनाली तिच्या आप्तेष्ट, मित्रमंडळींना सोबत घेऊन पुन्हा लग्न करणार आहे.’

अधिक वाचा  नागपूरमध्ये शिवसेनेला भीती राजकीय ‘गेम’ होण्याची

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनालीने मागच्या वर्षी रजिस्टर पद्धतीने लग्न केलं होतं. त्यातही अगदी एका तासात ते लग्न आटोपलं. पण आता सोनालीला महाराष्ट्रीयन पद्धतीने साग्रसंगीत लग्न करायचं आहे. हे लग्न ७ मे रोजी लंडनला पार पडणार आहे. सोनाली सध्या भारतात असून ती लवकरच लग्नासाठी परदेशी जायला निघणार आहे. ते दोघेही त्यांच्या लग्नाची तयारी करण्यात गुंतले आहेत.