मुंबई : ‘बिग बॉस मराठी’ चे पहिले तीनही सीजन प्रचंड गाजले. ‘बिग बॉस मराठी’ च्या तीनही सीजनला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. छोट्या पडद्यावरील सगळ्यात जास्त गाजणाऱ्या कथाबाह्य कार्यक्रमांमध्ये जर कोणता कार्यक्रम सगळ्यात जास्त लोकप्रिय असेल तर तो म्हणजे ‘बिग बॉस मराठी’. हिंदी ‘बिग बॉस’ प्रमाणे मराठी ‘बिग बॉस’ ने देखील मराठी प्रेक्षकांची मनं जिंकली. ‘बिग बॉस मराठी’ चे पहिले तीनही सीजन प्रचंड गाजले. ‘बिग बॉस मराठी’ च्या तीनही सीजनला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. आता ‘बिग बॉस मराठी’ पुन्हा एकदा प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज झालं आहे. ‘बिग बॉस मराठी’ चा चौथा सीजन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

अधिक वाचा  अखेर राज गर्जना होणार, २१ मे रोजी पुण्यात जाहीर सभा

‘बिग बॉस मराठी’ च्या पहिल्या पर्वाची विजेती ठरली होती मेघा धाडे, तर दुसऱ्या पर्वात शिव ठाकरे विजेत्याची ट्रॉफी घेऊन गेला होता. तिसऱ्या सीजनमध्ये विशाल निकम याने सगळ्यांची मनं जिंकत विजेत्याच्या ट्रॉफीवर नाव कोरलं. आता पुन्हा एकदा ‘बिग बॉस’ चं घर नवीन सदस्यांचं स्वागत करण्यासाठी सज्ज झालं आहे. या घरात अनेक नाती बनतात, बिघडतात तर काही नव्याने सांधली जातात. नवे मित्र मिळतात. काही कलाकार घरात तयार झालेली नाती पुढेही कायम जपत राहतात. आता या सीजनमध्ये कोणकोणते कलाकार खेळात सहभागी होणार याची माहिती मिळाली नसली तरी ‘बिग बॉस’ च्या घरात नव्याने तयारी सुरू झाली आहे.

अधिक वाचा  ‘रानबाजार’मधील बोल्ड सीन पाहून प्राजक्ता माळीच्या आईने दिली प्रतिक्रिया

सूत्रांच्या माहितीनुसार येत्या जून महिन्यात कार्यक्रमाचे नवे प्रोमो प्रेक्षकांना पाहायला मिळू शकतात तर जुलै महिन्यात ‘बिग बॉस’ चा नवा सीजन प्रेक्षकांना पाहायला मिळू शकतो. परंतु, इतर सीजनप्रमाणे लोकप्रिय अभिनेते आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर हे सूत्रसंचालकाच्या रूपात पाहायला मिळतील की नाही याबाबतीत कोणतीही माहिती मिळू शकलेली नाही.