मुंबई : येस बँक आणि डीएचएफएल (दिवाण हाऊसिंग फायनान्शिअल लिमिटेड) घोटाळा प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) रेडियस ग्रुपचे खासगी विकासक संजय छाब्रिया यांना अटक केली. एजन्सीच्या अधिकाऱ्यांनी मुंबई आणि पुण्यातील रेडियस ग्रुपशी संबंधित असलेल्या मालमत्तांवर छापे टाकले होते आणि अनेक तास छाब्रिया यांची चौकशीही केली होती.

सीबीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रेडिअस समुहाने मुंबईतील पश्चिम उपनगरातील निवासी प्रकल्पासाठी डीएचएफएलकडून कर्ज घेततले होते. तसेच त्याची ३ हजार कोटी रुपयांची व्याजाची रक्कमही या समूहाने थकवली होती. सीबीआयने या प्रकरणी २०२० मध्ये आरोपपत्र दाखल केले होते. गेल्या वर्षी या प्रकरणात येस बँकेचे संस्थापक राणा कपूर, त्यांचे कुटुंबीय आणि दिवाण हाऊसिंग फायनान्स लिमिटेडचे (डीएचएफएल) प्रवर्तक कपिल आणि धीरज वाधवान बंधू यांच्याविरोधात पुरवणी आरोपपत्रही दाखल करण्यात आले होते. येस बँकेने दिलेली संशयास्पद कर्जे आणि कपूर आणि वाधवान यांच्यात झालेल्या देवाणघेवी प्रकरणी ७ मार्च २०२० रोजी हा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

अधिक वाचा  ससून रुग्णालया'च्या शवागारातील मृतदेह कुजण्याची भीती,स्थलांतराच्या नावाखाली दुर्लक्ष

बँकेचे नुकसान केल्याच्या आरोपावरून सीबीआयकडून कपूर आणि डीएचएफएलची चौकशी कारण्यात येत आहे. एजन्सीच्या म्हणण्यानुसार, कपूर यांना डीएचएफएलमध्ये बँकेने केलेल्या ३ हजार ७०० कोटी रुपयांच्या गुंतवणूकीच्या बदल्यात ६५० कोटी रुपयांची लाच घेतली होती.

सीबीआयने वाधवान बंधूं विरूद्धच्या एफआयआरमध्ये नमूद केले आहे की, येस बँकेने डीएचएफएलमध्ये अल्प-मुदतीसाठी ३ हजार ७०० कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती. ती आजही परत करण्यात आलेली नाही. या प्रकरणी वाधवानांनी राणा कपूर यांना ६०० कोटी रुपयांची लाच दिली होती. जी कपूर यांच्या मुलींच्या नावे नोंदणीकृत कंपनी असलेल्या डीओआयटी अर्बन व्हेंचर्स (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेडला कर्जाच्या रूपात दिली गेली होती.

अधिक वाचा  भारतात 'संबंध' ठेवण्यास मुलींची आघाडी; नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हेमधून वास्तव समोर

सीबीआयचे अधिकारी म्हणाले, हे कर्ज डीओआयटी अर्बन व्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेडला ४० कोटी रुपये बाजारमूल्य असलेल्या मालमत्तांच्या तारणावर देण्यात आले होते. परंतु या मालमत्तेची किंमत ७५० कोटी रुपये असल्याचे दर्शविले होते. येस बँकेच्या मॅनेजमेंट क्रेडिट कमिटीचे प्रमुख असलेले राणा कपूर यांनी डीएचएफएलचे प्रवर्तक धीरज वाधवान आणि त्यांचे बंधू कपिल वाधवान यांनी वाधवान बंधूंच्या नियंत्रणाखालील एका कंपनीला केलेल्या अर्जावर आणखी ७५० कोटी रुपयांचे कर्ज दिले. तपासादरम्यान एजन्सीला असे आढळले की ७५० कोटी पौंडांचे कर्ज मंजूर केलेल्या उद्देशाने वापरले गेले नाही.

ईडी या प्रकरणी डीएचएफएल आणि कपूर यांचीही चौकशी करत आहे. आणि डीएचएफएलच्या प्रवर्तकांच्या मालकीच्या कंपनीला येस बँकेकडून कथित ७५० कोटी रुपयांच्या कर्जाच्या संदर्भात छाब्रिया यांचा जबाब नोंदवला होता. तपासादरम्यान ईडीला आढळले की, २०१८ मध्ये येस बँकेने रेडियस डेव्हलपर्ससह मुंबईतील वांद्रे रेक्लमेशन येथील झोपडपट्ट्यांच्या पुनर्विकासासाठी विश्वास रिअ‍ॅल्टर्सला ७५० कोटी रुपये दिले होते.

अधिक वाचा  'जेवढ्या शांततेत भोंगे उतरवले तेवढ्याच शांततेत...', किरण माने यांची संदेश देणारी पोस्ट चर्चेत

एजन्सीच्या चौकशीनुसार, येस बँकेने प्रोसेसिंग फी म्हणून ११८ कोटी रुपये आकारले आणि उर्वरित ६३२ कोटी रुपये विश्वास रिअल्टर्सला हस्तांतरित केले. डीएचएफएलच्या प्रवर्तकांशी संबंधित आणखी एक संस्था कायटा अ ॅडव्हायझर्सकडे हे पैसे ताबडतोब वळवण्यात आल्याचा दावा ईडीने केला आहे.

राणा कपूरच्या मदतीने येस बँकेत घोटाळा केल्याच्या आरोपाखाली सीबीआय आणि ईडीने दाखल केलेल्या खटल्यांप्रकरणी कपिल आणि धीरज वाधवान सध्या तुरुंगात आहेत तसेच कपूर हे सुध्दा सध्या तुरुंगात आहेत.