मुळशी(रिहे): बाल संस्कार ही काळाची गरज ओळखून मुळशीतील रिहे येथील वेदांत साधना वारकरी गुरुकुलात १ मे पासून धी शुद्धीकरण संस्कार शिबिर भरवले जाणार आहे. ह.भ.प. निवृत्ती महाराज बोरकर शास्त्री यांच्या मार्गदर्शना द्वारे २० मे २०२२ पर्यंत होणाऱ्या शिबिराला राज्यभरातून मोठा प्रतिसाद मिळत आहे. अखंड दहा वर्षे रिहे ता. मुळशी येथील बोरकर मळा (शेडगेवाडी) रस्त्यावर ह.भ.प. निवृत्ती महाराज बोरकर शास्त्री यांचे वारकरी गुरुकुल सुरू आहे. मोबाईलच्या काळात मूल्य संस्कृती लोप पावत असल्याने बोरकर शास्त्री यांनी १ मे ते २० मे दरम्यान १२ ते २० वयोगटातील मुलांसाठी संस्कार शिबिराचे आयोजन केले आहे.

अधिक वाचा  संभाजीराजेंचा शिवबंधनास नकार! `प्लॅन बी` मध्ये ही ३ नावे!

या शिबिरात शिकवले जाणारे विषय मोबाईल एक आत्मघात, नामस्मरण ध्यान, श्री गीता, मृदुंग, खेळ नीतिमूल्ये, योगासने, संत चरित्र, श्री हरिपाठ, सुभाषिते, व्यायाम, भूतदया, वारकरी चाली, व्याख्याने याचे शिक्षण दिले जाणार आहे. ह. भ. प. प्रमोद काळे महाराज, महाराज महादेव तौर,महाराज सारंग शिरसागर, महाराज शरद देवडे, महाराज शुभम शिंदे हे शिक्षक प्रशिक्षण देणार आहे. १ मे २०२२ दुपारी ३.०० वाजता शिबिराचे उद्घाटन आचार्य स्वामी भारतानंद गिरी, गुरुवर्य पंडित महाराज शिरसागर, ह.भ.प. तात्या महाराज बोरकर व सुरेश महाराज बोरकर यांच्या हस्ते होणार असून, याप्रसंगी वारकरी व राजकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. शिबिराच्या सांगते पूर्वी 2022 रोजी मातृ-पितृ पूजन सोहळ्याचे आयोजन केले आहे.