पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे  यांनी एक मे रोजी औरंगाबाद येथे सभा होणार आहे. या सभेकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. पण त्या सभेच्या एक दिवस आधी पुण्यातमहाविकास आघाडी सभा होणार असून सर्व बडे नेते या सभेला उपस्थित राहणार असल्याची जोरदार चर्चा होती. आता या सभेबाबत उपमुख्यंमत्री अजित पवार यांनाच माहिती नसल्याचे स्पष्ट झाले आहे. कारण ही सभेला केवळ स्थानिक पातळीवरील नेतेच उपस्थित राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

पवार म्हणाले, पुण्यामध्ये होणाऱ्या ३० तारखेच्या सभेच मी पहिल्यांदाच ऐकत आहे. हे तुम्हाला कुणी सांगितलं असा सवाल त्यांनी पत्रकारांसमोर उपस्थित केला आहे. तर ही गोष्टी कुणी पसरवली हे मला माहित नसल्याचे ते यावेळी म्हणाले आहेत. उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे, बाळासाहेब थोरात, नाना पटोले हे सर्व नेते अशा सभेबाबत निर्णय घेतात. त्यांच्याशी माझी चर्चा झालेली नाही. पण यांच्याशिवाय अन्य कोणी नेता असेल तर त्यांचं नाव सांगा. मी त्यांना विचारतो असे त्यांनी सांगितले आहे.

अधिक वाचा  वैष्णव मांदियाळीला कैक अडथळे; परी मनी आस पाहू रूप तुझं सावळे...

”देशामध्ये राज्यांची आर्थिक आणि राजकीय कोंडी करणारे निर्णय केंद्रामधील मोदी सरकार घेत आहे. त्यामधून घटनेमध्ये अपेक्षित असलेल्या संघराज्यात्मक लोकशाही व्यवस्थेला सुरुंग लागत आहे. केंद्र सरकारची एक पक्षीय नोकरशाही व जुलूमशाही लादण्याचे उद्दीष्ट स्पष्टपणे दिसत आहे. संसदेमध्ये विरोधकांचा आवाज दडपून राज्यांचे करविषयक अधिकार, राज्यांचे करउत्पन्न, कामगार तसेच शेती विषयक कायदे, कायदा सुव्यवस्थेबाबतचे अधिकार तसेच नोकरशाहीवरील नियंत्रणाचे अधिकार अशा प्रत्येक बाबतीमध्ये महाराष्ट्राची जाणीवपूर्वक कोंडी केली जात आहे. राजकीय विरोधकांना दडपण्यासाठी केंद्रिय यंत्रणांचा बेबंद गैरवापर केला जात आहे. महाराष्ट्रातील जनता केंद्राची ही घटनाविरोधी दादागिरी सहन करणार नाही. हा निर्धार पुण्यात होणाऱ्या सभेमधून व्यक्त केला जाणार असल्याचे पुणे महाविकास आघाडीने सांगितले आहे.”