पुणे – पर्यटन आणि गावी जाण्यासाठी उन्हाळ्याच्या सुट्ट्यांच्यानिमित्त रेल्वे प्रवाशांच्या गर्दीत वाढ होते. या पार्श्‍वभूमीवर मध्य रेल्वेकडून एप्रिल ते जून या कालावधीत 574 विशेष रेल्वे सोडण्यात येणार आहेत. त्यापैकी सुमारे 100 रेल्वे पुणे स्थानकातून रवाना होणार आहे.

दरवर्षी एप्रिलनंतर प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता रेल्वेकडून “समर स्पेशन ट्रेन्स’ सोडण्यात येतात. यंदादेखील 574 विशेष रेल्वे धावणार आहे. मध्य रेल्वेअंतर्गत मुंबई, लोकमान्य टिळक टर्मिनस, पनवेल, नागपूर आणि साईनगर शिर्डी या स्थानकांतून रेल्वे धावणार आहेत. यामध्ये मुख्यत्वे मनमाड, नागपूर, मालदा टाउन, मडगाव, शालिमार, गोरखपूर, समस्तीपूर, करमाळी, बिदर आदी मार्गांचा समावेश आहे.

अधिक वाचा  उद्धव ठाकरेंच्या व्यावसायिक पार्टनरचे कसाबशी संबंध ,सोमय्यांचा आरोप

पुणे स्थानकातून सुमारे 100 विशेष रेल्वे धावणार आहेत. यामध्ये करमाळी, जयपूर, दानापूर, वीरांगणा लक्ष्मीबाई स्टेशन (झाशी), कानपूर या मार्गांचा समावेश आहे, अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली.