पुणे : पुण्यात आता पुन्हा एकदा सीएनजीच्या दरात वाढ झाली आहे. पुण्यात आज सीएनजीच्या दरात 2 रुपये 20 पैसे प्रति किलो इतकी वाढ झाली आहे. यामुळे आता पुण्यात सीएनजीचा दर 77 रुपये 20 पैसे प्रति किलो इतका झाला आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या दरामुळे हैराण झालेले नागरिक सीएनजी गाड्या खरेदी करत आहेत किंवा आपल्या गाडीत सीएनजी किट बसवत आहेत. मात्र, आता सीएनजीच्या दरातही सातत्याने वाढ होत असताना दिसून येत आहे.

(Compressed Natural Gas (CNG) price in Pune city increased by Rs 2.20. It will cost Rs 77.20 per kg) गेल्या दोन महिन्यांचा विचार केला तर सीएनजीच्या दरात ही तिसरी वाढ झाली आहे. यापूर्वी सीएनजीचा दर 68 रुपये इतका होता मात्र, पाच रुपयांनी वाढ झाल्याने हा दर 73 रुपयांवर पोहोचला. त्यानंतर पुन्हा एकदा दोन रुपयांची वाढ होऊन हा दर 75 रुपयांवर पोहोचला आणि आता पुन्हा एकदा 2 रुपये 20 पैशांनी वाढ झाल्याने सीएनजीचा दर 77 रुपये 20 पैसे प्रति किलो इतका झाला आहे.

अधिक वाचा  सेनेचा राजेंना धक्का....; ठिणगी कोणी लावली अन् टीकेचा, त्रासाचा धनी? सुजय विखे

सीएनजी दर वाढ होण्यामागे काय कारणं आहेत याची माहिती ऑल इंडिया पेट्रोल डीलर्स असोसिएशनचे प्रवक्त अली दारूवाला यांनी दिली आहे.

सीएनजीच्या किमती वाढण्याचे मुख्य कारण पुढीलप्रमाणे

भारतातील देशांतर्गत उत्पादित गॅस भारतीय ग्राहकांच्या मागणीसाठी पुरेसा नाही, गेल्या एका वर्षात भारताची मागणी तिप्पट झाली आहे.

भारत गेल्या अनेक वर्षांपासून कतार, मस्कत आणि इतर अरबी देशांकडून 20 डॉलर प्रति सिलिंडरने गॅस खरेदी करत होता.

रशियन देशांनी युक्रेनला रशियाच्या विरोधात पाठिंबा दिल्याने युरोपीय देशांना अचानक गॅस पुरवठा बंद केल्यामुळे, रशियन सरकारने त्यांचा पुरवठा बंद केला आहे.

अधिक वाचा  शिखर धवनला त्याच्या वडिलांनी बदडले, प्लेऑफमध्ये न पोहोचल्याने नाराज

या युरोपीय देशांनी अरबी देशांकडून ४० डॉलर प्रति सिलिंडर या दराने गॅस खरेदी करण्यास सुरुवात केली आहे जी किमतीच्या दुप्पट आहे….आणि युरोपियन युनियनसाठी पुन्हा ४० डॉलर स्वस्त गॅस आहे.

40 डॉलरच्या मागणीने भारतीय तिजोरीवर अतिरिक्त भार टाकला आहे आणि असेच चालू राहिल्यास येत्या काही दिवसांत CNG 80 रुपये प्रति किलोग्रॅमवर ​​पोहोचेल.

शेवटचे कारण म्हणजे सागरी मार्गाने भारतात येणारी LNG मालवाहू जहाजे देखील युद्धजन्य परिस्थितीमुळे अरबी देशांतून मार्गात अडचण आल्याने विस्कळीत झाली होती….

जोपर्यंत रशियन आणि युक्रेन युद्ध संपत नाही तोपर्यंत आम्ही किंमती कपातीच्या स्वरूपात कोणतीही विश्रांतीची अपेक्षा करू शकत नाही.