कोथरूड शिवसेना व सामाजिक संस्था श्री शिवसाई संस्थेच्या वतीने १ मे महाराष्ट्र दिनानिमित्त परिसरातील नागरिकांसाठी दोन दिवसीय सांस्कृतिक महोत्सवाचे कार्यक्रम आयोजित केले जात असून यामध्ये सांस्कृतिक कार्यक्रम, आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आलेला आहे.

कोथरूड शिवसेना आणि श्री शिवसाई संस्थेच्या वतीने शनिवार दिनांक ३०/०४/२०२२ रोजी फक्त महिलांसाठी लावण्यांचा कार्यक्रम यशवंतराव चव्हाण नाट्यगृह कोथरूड येथे आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमाचे उद्घघाटन मा.सौ.किशोरीताई पेडणेकर (कार्यक्षम महापौर मुंबई) यांच्या हस्ते होणार आहे. सदरील कार्यक्रमाच्या मोफत प्रवेशिका शिवसेना शाखा पौड रोड,आयडियल कॉलनी, कोथरूड / संपर्क क्रमांक ७७१९९३३३०३ तेथे मिळतील.

अधिक वाचा  अभिनेत्री अभिज्ञा भावेसोबत सेटवरून रात्री परतताना घडला भयानक प्रकार

महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने शिवसेना शाखा पौड रोड,आयडियल कॉलनी, कोथरूड येथे सकाळी १० ते दुपारी ०२आरोग्य शिबीर आणि सायं.०५ ते ०८ वाजेपर्यंत चहापान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे जयदीप पडवळ (मा.सभासद,पुणे मनपा,वृक्ष प्राधिकरण समिती) यांनी सांगीतले.