गुहागर : आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ तसेच स्वतः बाबासाहेबांना पाहिलेले व चळवळीत काम केलेले जुनेजाणते कार्यकर्ते तसेच बौद्धजन सहकार संघ शाखा क्र. २४ (गाव शाखा) या शाखेचे कोषाध्यक्ष पद भूषविलेले निस्थावंत कार्यकर्ते सखाराम भागोजी जाधव यांच वयाच्या ९७ व्या वर्षी अल्पशा आजाराने वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले, त्यांच्या अंत्ययात्रेस तालुक्यातील सर्व स्तरातील मान्यवर व सर्वसामान्य लोकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती.

दिवंगत सखाराम जाधव हे प्रेमळ व मनमिळावू, सोज्वळ व सर्वसमावेशक, स्वाभिमानी होते, त्यांच्यामागे धर्मपत्नी, मुलगे चि. अनिल, चि. सुनील, मुलगी लता, सुना, नातवंडे, पतवंडे असा मोठा परिवार आहे.

अधिक वाचा  पुण्यात राजकीय वातावरण तापलं; राष्ट्रवादीचे भाजपविरुद्ध मूक आंदोलन

दिवंगत सखाराम जाधव यांनी बाबासाहेबांना अगदी जवळून पाहिलेलं आहे, ज्या ज्यावेळी बाबासाहेब कोकणात आले त्यांच्या सर्वसभांना ते जातीने हजर राहत असे निष्ठावंत, इमानदार कार्यकर्ते आपल्यातून निघून गेल्याने समाजातील सर्वच स्तरातून हळहळ व्यक्त केली जात आहे

त्यांचा पुण्यानुमोदन विधी व शोकसभा कार्यक्रम १ मे २०२२ रोजी सकाळी १० वाजता त्यांच्या राहत्या घरी मु. मुंढर, ता. गुहागर जिल्हा रत्नागिरी येथे एम. जी. गमरे यांच्या अध्यक्षतेखाली करण्याचे योजिले आहे. तरी सदर कार्यक्रमास उपस्थित राहून दिवंगत सखाराम जाधव यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करावी असे आव्हान शाखेचे सरचिटणीस अजित गमरे यांनी शाखेने काढलेल्या परिपत्रकात केले आहे.