महाराष्ट्रात गाणगापूर येथील अक्कलकोट हे देशा- परदेशातील स्वामी भक्तांसाठी महत्त्वाचं स्थळ आहे. वर्षभर भाविक येथे स्वामी महाराजांच्या दर्शनासाठी येतात. ‘भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे.’ या त्यांच्या वचनाने अनेकांना कठीण प्रसंगातूनही पुन्हा उभं राहण्यासाठी प्रेरणा मिळते.

पौराणिक आधारानुसार, स्वामींनी चैत्र वद्य त्रयोदशीच्या दिवशी अक्कलकोट येथील ‘वटवृक्ष समाधी मठ स्थानी’ दुपारी आपल्या अवतारकार्य स्वामींनी संपविले. ग्रेगेरियन कॅलेंडरनुसार यंदा २८ एप्रिल दिवशी स्वामी समर्थांची पुण्यतिथी असल्याने त्यांच्या भक्तांसाठी आजचा दिवस खास आहे.

सुमारे १९ व्या शतकामध्ये स्वामी समर्थ अक्कलकोट स्वामी हे महाराष्ट्रात वास्तव्यास होते. धार्मिक संदर्भानुसार, अक्कलकोट मध्ये खूप काळ वास्तव्य असलेले श्रीपाद वल्लभ आणि श्रीनृसिंहसरस्वती यांच्या नंतर भगवान श्रीदत्तात्रयांचे ते तिसरे पूर्णावतार आहेत अशी अनेकांची मान्यता आहे. गाणगापूरचे श्री नृसिंह सरस्वती हेच नंतर श्रीस्वामी समर्थांच्या रूपाने प्रकट झाले. अशी देखील धारणा आहे. सुमारे १८५६ मध्ये स्वामी समर्थ महाराजांनी अक्कलकोटमध्ये प्रवेश केला आणि २२ वर्ष तेथे वास्तव्य केल्याने अक्कलकोट हे तीर्थक्षेत्र झाले.

अधिक वाचा  औरंगजेबची कबर पर्यटकांसाठी बंद ; काय आहे प्रकरण?

अनन्य भावाने भक्ती करणाऱ्या भक्तांच्या सदैव पाठीशी राहणाऱ्या आणि ”भिऊ नकोस..मी तुझ्या पाठीशी आहे.” असे अभिवचन देणाऱ्या श्री स्वामी समर्थ महाराजांची आज पुण्यतिथी आहे. चैत्र शुद्ध द्वितीय या दिवशी स्वामी समर्थ महाराज अक्कलकोट येथे दाखल झाले. श्रीपाद वल्लभ व नृसिंहसरस्वती यांच्या नंतरचे भगवान श्रीदत्तात्रेयांचे ते तिसरे पूर्णावतार अवतार आहेत, अशी मान्यता आहे. स्वामी समर्थ अक्कलकोटला प्रकट होण्यापूर्वी फिरत फिरत मंगळवेढ्याला आले. तेथे त्यांचे नाव सर्वत्र झाले. तेथून सोलापूर व नंतर अक्कलकोटला आले.

श्री स्वामी समर्थ हे श्री दत्त महाराजांचा पूर्ण ब्रह्मस्वरूप तिसरा अवतार आहे. भक्तांनी त्यांना ज्या दृष्टीने पाहिले त्या स्वरूपात त्यांनी दर्शन दिले आहे. कोणाला श्री विठूमाऊलीच्या रूपात त्यांचे दर्शन घडले तर कुणाला श्री भगवान विष्णूच्या स्वरूपात तर कुणाला भगवती देवीच्या रूपात महाराजांनी भक्तांच्या कल्याणासाठी अनेक लीला दाखविल्या. स्वामी समर्थ आंध्रप्रदेशातील श्री शैलम क्षेत्राजवळी कर्दळीवनातून प्रकट झाले तेथून ते आसे तुहिमाचलास गेले.

अधिक वाचा  पुणे आणि नागपूर घटनेचे 'कनेक्‍शन'? एक सारखीच घटना घडल्याने वाढले गूढ

अक्कलकोट येथे स्वामी महाराज प्रथम आले ते खंडोबाच्या देवळातील कट्ट्यावर स्थानापन्न झाले. आपल्या वास्तव्यात त्यांनी अनेकविध चमत्कार केले. राजापासून रंकापर्यंत अनेकांवर प्रेमाचा वर्षाव केला. आपण यजुर्वेदी ब्राह्मण, गोत्र काश्यप, रास मीन, असल्याची माहितीही त्यांनी स्वत:च सांगितली आहे. शिष्यद्वय श्रीबाळप्पा व श्री चोळप्पा यांचेवरही त्यांनी कृपा केली. तेथून स्वामींनी संपूर्ण देशात सर्वत्र भ्रमण केले. विविध ठिकाणी ते विविध नावांनी प्रसिद्ध होते.

श्री नृसिंह सरस्वती ह्यांनी गाणगापुरात पादुकांची स्थापना केल्यानंतर कर्दळीवनात अदृश्य झाले. 300 वर्ष कठोर तपश्चर्या करत असताना मुंग्यांनी त्यांचा वर वारूळ केले. एके दिवशी एक लाकूडतोड्या त्या वनात लाकूड तोडीत असतांना त्याचा हातून कुऱ्हाड निसटून त्या वारुळांवर पडली. कुऱ्हाड वारुळावर पडताच त्यातून रक्ताची धार उडाली. त्याच क्षणात दिव्य तेज पुंजातून त्या लाकूडतोड्यासमोर एक आजानुबाहू तेजस्वी मूर्ती प्रकटली ते अक्कलकोटचे स्वामी समर्थ होय.

अधिक वाचा  मोठी बातमी : राकेश टिकैत यांची भारतीय किसान यूनियन मधून हकालपट्टी; राजकारण भोवले

आपल्याहातून एक महापुरुष जखमी झाल्याचे समजल्यावर त्याला दुःख व भय वाटू लागले. त्यांनी त्या लाकूडतोड्यास अभय व आशीर्वाद देऊन गंगातीरी प्रयाण केले. नंतर ते कलकत्त्यास गेले. तेथे महाकालीचे दर्शन घेतले. उत्तरदिशेसतून भ्रमण करतं-करतं दक्षिणेस आले.

इ.स. १८५६ साली स्वामीने अक्कलकोट मध्ये अवतरले त्यामुळे अक्कलकोट हे तीर्थक्षेत्र झाले. येथे त्यांनी अनेक मान्यवरांना मार्गर्शन दिले. इ.स. १८७५ साली महाराष्ट्रात मोठा दुष्काळ पडला होता त्या वेळी क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके स्वामींच्या दर्शनास गेले होते. त्यावेळी त्यांनी सध्या लढायची वेळ नाही असे सांगितले. त्यांनी श्रीक्षेत्र त्रयम्बकेश्वर येथे शेगावच्या श्री गजानन महाराज आणि शिर्डीचे श्री साई महाराजांना दीक्षा दिली. तत्पश्चात स्वामी पंढरपूर, मोहोळ भ्रमण करीत सोलापुरास आले. त्यानंतर सोलापुरात आले. मंगळवेढे गावात राहून त्यांनी आपल्या लीलेने भक्तांना दुःख मुक्त केले.स्वामीने अनेकांना कामाला लावून इसवी सन १८७८ मध्ये आपले अवतारकार्य संपविले असे म्हटले जाते.