‘हिंदी ही आता राष्ट्रभाषा राहिलेली नाही’ असे वक्तव्य केल्यामुळे दाक्षिणात्य अभिनेता किच्चा सुदीप चर्चेत आहे. त्याच्या वक्तव्यामुळे सध्या वाद निर्माण झाला आहे. अनेकांनी या वादावर प्रतिक्रिया दिली आहे. आता अभिनेता सोनू सूदने देखील त्याचे मत मांडले आहे.

सोनू सूदने नुकतीच एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये हिंदी भाषेवरुन सुरु असलेल्या वादावर काही प्रश्न विचारण्यात आले. “हिंदी ही फक्त एक राष्ट्रीय भाषा आहे, असे मला वाटत नाही. भारतात एकच भाषा आहे ती म्हणजे मनोरंजन. तुम्ही कोणत्या क्षेत्राशी संलग्न आहात, हे इथे महत्त्वाचे नसते. तुम्ही लोकांचे मनोरंजन केल्यास ते देखील तुमच्यावर प्रेम करतात. तुमचा आदर करतात आणि तुमचा स्वीकारही करतात” असे सोनू सूद म्हणाला.

अधिक वाचा  राज्यसभा नव्हे संपूर्ण महाराष्ट्रच! संभाजीराजेंचे नवे पोस्टर चर्चेत?

काय आहे प्रकरण?

अभिनेता किच्चा सुदीप त्याच्या आगामी चित्रपटाच्या प्रोमोशनवेळी हिंदी भाषेवरुन वक्तव्य केले होते. “तुम्ही काही वेळापूर्वी म्हणालात की सध्या दक्षिणेकडे अनेक चित्रपटांची निर्मिती होत आहे. पण मला त्यात एक छोटीशी दुरुस्ती करायची आहे. हिंदी ही आता राष्ट्रभाषा राहिलेली नाही. संपूर्ण सिनेसृष्टी ही विविध भाषांमध्ये चित्रपटांची निर्मिती करत आहे. अनेक बॉलिवूडमधील निर्माते व दिग्दर्शक तेलुगू, तामिळमध्ये चित्रपट डब करत आहेत. पण त्यांना त्यातून हवे तितके यश मिळत नाही. उलट आज आम्ही सर्वत्र चालणारे चित्रपट तयार करत आहोत” असे किच्चा सुदीप म्हणाला होता.

अधिक वाचा  २२१ जोडप्यांचे तडजोडीने फुलले संसार; स्वखुशीने १०४ विभक्त कुटुंब

सुदीपच्या या वक्तव्यानंतर बॉलिवूड अभिनेता अजय देवगणने त्याला सुनावले होते. ‘जर तुमच्या मते हिंदी ही आपली राष्ट्रभाषा नाही, तर मग तुम्ही तुमच्या मातृभाषेतील चित्रपट हिंदीत डब करून का प्रदर्शित करता? हिंदी ही आपली मातृभाषा आहे, होती आणि नेहमीच असेल’ असे अजय देवगण म्हणाला.