पुणे : पुण्यातील एक cctv व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर प्रचंड व्हायरल होत आहे. ज्यातून अतिशय धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे. पुण्याच्या रस्त्यावर एक व्यक्ती झोपलेला असताना त्या व्यक्तीच्या अंगावर गाडी घातल्याने आजूबाजूच्या परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

दरम्यान हि घटना पुण्यातील मार्केटयार्ड रोड सॅलिसबरी पार्क येथे घडली आहे आणि अंगावरून गाडी घालणार व्यक्ती मुंबईचा असुंतो एक मोठा व्यावसायिक आहे. दरम्यान घडलेल्या प्रकरणावरून मार्केटयार्ड पोलीसांनी ठाण्यात अनूप मेहता या व्यावसायिकावर गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान हि घटना २० एप्रिल रोजी घडली आहे. तसेच या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज देखील आता समोर आल आहे. या सीसीटीव्ही फुटेजमध्ये व्यक्तीच्या डोक्यावरून चारचाकी गेल्याचे दिसत आहे. एक व्यक्ती फुटपाथच्या बाजूला झोपली होती.

अधिक वाचा  भारत अन् दक्षिणपूर्व आशियामध्ये उत्पादन वाढवण्याची Appleचा प्लॅन

त्यावेळी गाडी पुढे घेताना अंदाज न आल्याने या व्यावसायिकाने अंगावरून गाडी चालवली. या प्रकरणात आता व्यावसायिकाला अटक करण्यात आली आहे परंतु या व्यवसायाने भरलेल्या वहत्यारस्त्यात व्यक्तीच्या अंगावरून घातलेल्या गाडीचा व्हिडीओ समोर आल्यानंतर खबल उडाली आहे.

२० एप्रिलला व्यावसायिक अनूप मेहता हे चारचाकी गाडी चालवत होते. त्यांना समोर व्यक्ती झोपलेली आहे, हे दिसले नाही. त्यांनी गाडी ती चक्क रस्त्यावर झोपलेल्या माणसाच्या अंगावरुन चालवली. त्यामुळे या व्यक्तीचा मृत्यू झाला. याप्रकरणी आता मेहतांवर गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास सुरू आहे.