मुंबई :‘पावनखिंड’च्या अफाट यशानंतर आता दिग्पाल लांजेकर यांचा नव्यानं आणखी एक ऐतिहासिक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. तो म्हणजे ‘शेर शिवराज’. चित्रपटाला लोकांचा प्रतिसाद मिळत असताना, यामध्ये मुख्य अभिनयाची भूमिका करणारे चिन्मय मांडलेकर यांनी मात्र या चित्रपटाबाबत एक खंत व्यक्त केली आहे.

‘शेर शिवराज ‘या चित्रपटात महाराजांच्या युद्धनीतीचं मूर्तस्वरूप प्रेक्षकांसमोर मांडण्याचा प्रयत्न दिग्दर्शकानं केला आहे. महाराजांचे विविध गुण, दूरदर्शिपणा, युद्धनैपुण्य, राजकारणातलं अष्टपैलुत्त्व आपल्याला त्यांच्या जीवनप्रवासात दिसतं. हाच प्रवास टप्याटप्यानं दिग्दर्शक मांडतो.

शिवाजी महाराजांनी विदुर, कृष्ण, चाणक्य, शुक्राचार्य, हनुमान आणि राम अशा सर्वांना आत्मसात केलं होते. आई जिजाऊसाहेबांकडून रामायण आणि महाभारताची शिकवण घेतली. तिथूनच कथानकाचा प्रारंभ होतो. ‘नरसिंह आणि हिरण्यकश्यपू’ यांची गोष्ट सर्वांना ठाऊक आहे. याच कथानकाचा कुशलतेनं वापर करून चित्रपटाचं उपकथानक रचलेलं आहे.

अधिक वाचा  राज ठाकरेंची तोफ धडाडणार; पुण्यात अखेर रविवारी सभा निश्चित

शिवाजी महाराजांची आणखी एक धाडसी मोहिम अफजल खान वध म्हणजेच ‘शेर शिवराज’ हा सिनेमा. स्वराज्यावर सावट होऊन आलेल्या शत्रूला पायदळी तुडवून त्यांच्या छाताडात भगवा गाडायचा असं म्हणणारे महाराज ‘शेर शिवराज’ च्या निमित्ताने सर्वांच्या भेटीला आले आहेत.

मात्र, या चित्रपटाबाबत नुकतीच एक मुलाखत झाली, त्यावेळी चिन्मय मांडलेकर यांनी एक खंत व्यक्त केली. चिन्मय मांडलेकर म्हणाले, महाराज्यांच्या पराक्रमाबद्दलच्या सिनेमांसाठी प्राईम शो मिळण्यासाठी झगडावं लागतं मला याची खंत वाटते. कारण आम्हाला शो मिळतात, मात्र रात्री 11 चा शो मिळतो. सकाळी 8- 10 चे शो मिळतात.

अधिक वाचा  कपिल सिब्बलांचा काँग्रेसला रामराम; सपाकडून राज्यसभेची उमेदवारी

तसेच म्हणाले, जेव्हा रात्री कामावरुन 8-9 वाजता नोकरदार वर्ग घरी येतो. मुलांच्या सुटट्या सुरु आहेत. तेव्हा बरेच गावातली लोकं आम्हाला सोशल मीडियावर मॅसेज करतात. गावात प्राईम टाईम शो नाहीयेत आम्हाला आमच्या मुलांना आम्हाला हा सिनेमा प्राईम टाईम शोवेळी घेवून जायचं आहे. त्यामुळे सध्या आम्ही त्यासाठी प्रयत्न करत असल्याचं मांडलेकरांनी सांगितले.