देशातील महागाई दिवसेंदिवस वाढत असून यामध्ये सर्वसामान्य नागरिकांचे होणारे हाल लक्षात घेऊन कोथरूड भागांमध्ये पुणे शहर काँग्रेस कमिटी व कोथरूड बाॅल्क काँग्रेस कमिटी च्या वतीने केंद्रातील मोदी सरकारने सातत्याने महागाई वाढ विरोधात महागाई जुमला आंदोलन कर्वे पुतळा कोथरूड येथे करण्यात आले.

देशातील नागरिकांचा अन्न वस्त्र निवारा या प्राथमिक गरजा पूर्ण होत नसताना केंद्रातील सरकार मात्र याकडेही हेतुपूर्वक दुर्लक्ष करून राज्य आणि केंद्र यांचा वाद खूप मोठा असल्याचे भासवण्याचा प्रयत्न करत आहे; परंतु अन्न ही मुख्य समस्या वाढत्या महागाईमुळे अत्यंत गंभीर बनली आहे. या वाढत्या महागाईला रोखण्यासाठी केंद्र शासनाच्या वतीने ठोस उपाययोजनांची गरज असल्याचे मत यावेळी कोथरूड ब्लॉक अध्यक्ष विजय खळदकर यांनी व्यक्त केले. केंद्र शासनाच्या वतीने सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देण्यापेक्षा अन्य जाती वादक मुद्द्यांना जास्त महत्त्व देत सर्वसामान्य नागरिकांची पिळवणूक केली जात असून याबाबत आवाज उठवण्याची मागणी यावेळी आंदोलनकर्त्यांनी केली.

अधिक वाचा  पेट्रोल-डिझेलवरील व्हॅट कपात म्हणजे 'उंटाच्या तोंडात जिरे'; फडणवीसांची टीका

यावेळी बाॅल्क अध्यक्ष विजय खळदकर, शिवा मंत्री, आण्णा राऊत, उमेश कंधारे, संदीप मोकाटे, दत्ता जाधव, आण्णा गोसावी, कान्हो साळुंके, शिला राऊत, मनिषा करपे, राजा साठे, राजू मगर, राज जाधव, अजित ढोकळे, जीवन चाकणकर, मंगेश निम्हण, शारदा वीर, कुष्णा नाकते, युवराज मदगे प्रताप शिळिमकर संदीप कुदळे, मोहन आवळे, भगवान कडू, दत्ता उभे, बालाजी शिंदे, माने सर, जगदीश जगताप, शिवाजी भोईटे,मामा गायकवाड आदी उपस्थित होते.