सध्या सर्वत्र दाक्षिणात्य चित्रपटांचा बोलबाला पाहायला मिळत आहे. पुष्पा, RRR नंतर १४ एप्रिल रोजी केजीएफ चॅप्टर २ हा चित्रपट पाहायला मिळाला. या चित्रपटात अभिनेता यश, संजय दत्त आणि रवीना टंडन यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करताना दिसत आहे. त्यानंतर आता केजीएफ ३ कधी येणार? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. स्वत: यशने यावर प्रतिक्रिया दिली आहे.

यशने नुकताच एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्याने रॉकी आणि त्याच्या आयुष्यातील अनेक गोष्टी केजीएफ चॅप्टर ३मध्ये दाखवण्यात येणार असल्याचे म्हटले आहे. ‘मी आणि प्रशांतने केजीएफ चॅप्टर ३ साठी अनेक सीन्सचा विचार केला आहे. अशा अनेक गोष्टी होत्या ज्या केजीएफ चॅप्टर २मध्ये दाखवता आल्या नाहीत. त्यामुळे पुढच्या भागात अनेक धमाकेदार सीन्स असतील. पण ही केवळ एक कल्पना आहे. सध्या आम्ही त्यावर विचार करत नाही’ असे यश म्हणाला.

अधिक वाचा  पुणे महापालिकेचे SC आणि ST चे आरक्षण जाहीर; आता महिला आरक्षण सोडतीकडे लक्ष

‘केजीएफ चॅप्टर २’ हा चित्रपट तेलुगू, हिंदी, कन्नड आणि तामिळ या भाषांमध्ये प्रदर्शित झाला असून बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करताना दिसत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रशांत नील यांनी केले आहे. ‘केजीएफ चॅप्टर १’ या चित्रपटाचा शेवट ज्या ठिकाणी झाला तेथूनच पुढे ‘केजीएफ चॅप्टर २’ ची सुरुवात होणार आहे. या चित्रपटात रवीना टंडनने एक राजकीय व्यक्तीची भूमिका साकारली आहे. आता हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करताना दिसत आहे.