पिंपरी : हातात तलवार, कोयते घेऊन, त्याची ‘रील’ बनवून ती सोशल मीडियाच्या ‘इंस्टा’वर व्हायरल करणाऱ्या भाईना पोलिसांनी हिसका दाखवला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून समाजात दहशत पसरविण्याचा प्रयत्न करणाऱ्या तिघांना गुंडा विरोधी पथकाने अटक केली आहे. त्यांच्याकडून 6 कोयते आणि 2 तलवारी जप्त केल्या आहेत.

अक्षय उर्फ पप्पू महादेव खोजे (21, रा. जाधववाडी, चिखली), ओंकार उर्फ भिकू प्रशांत ठाकूर (18, रा. माळवाडी, सोळू, खेड) आणि अक्षय देविदास चव्हाण (23, रा. जाधववाडी, चिखली) या तिघांना अटक केली आहे. या प्रकरणी आळंदी आणि चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

अधिक वाचा  राज ठाकरेंची तोफ धडाडणार; पुण्यात अखेर रविवारी सभा निश्चित

सोशल मीडियावर भाईगिरी करतानाचे व्हिडीओ गुंडा विरोधी पथकाच्या हाती लागले. पोलिसांनी तांत्रिक तपास करुन या भाईना तांब्यात घेतले. तसेच त्यांच्याकडे असणारी हत्यारे जप्त केली. दोन वेगवेगळ्या कारवायांमध्ये पाच हत्यारे जप्त करण्यात आलेली आहेत.