पुणे –राज्यातील विद्यापीठांचे कुलगुरू ऑफलाइन पद्धतीने परीक्षा घेण्यावर ठाम आहेत. दि. 1 जून ते 15 जुलैदरम्यान विद्यापीठांकडून परीक्षा घेतल्या जाणार असल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी आज ट्‌विंट करून दिली.

करोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने आता ऑफलाइन पद्धतीने परीक्षा घेण्याची तयारी विद्यापीठांकडून करण्यात येत आहे. मात्र विद्यार्थ्यांकडून ऑनलाइन परीक्षेची मागणी होत आहे. या पार्श्‍वभूमीवर उच्च शक्षणमंत्री उदय सामंत यांनी राज्यातील विद्यापीठांच्या कुलगुरूंची बैठक घेतली. बैठकीनंतर सामंत यांनी ट्विटद्वारे माहिती दिली. कुलगुरूंच्या बैठकीमध्ये ऑफलाइन परीक्षा घेण्यासंदर्भात चर्चा झाली. त्यात बहुसंख्य कुलगुरूंनी विद्यापीठाच्या परीक्षा ऑफलाइन पद्धतीने झाली पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्‍त केली आहे. परीक्षा घेताना विद्यार्थ्यांना प्रश्‍न संच विद्यापीठ देणार आहे. दोन पेपरमध्ये दोन दिवसांचे अंतर असणार आहे, परीक्षा मेमध्ये न घेता 1 जून ते 15 जुलैपर्यंत होतील असे कुलगुरूंनी निश्‍चित केले आहे, असे उदय सामंत यांनी म्हटले आहे.

अधिक वाचा  महात्मा फुले वाडा प्रवेशद्वारावरील बोर्ड संतप्त जमावाने काढला; समता परिषदेचे आंदोलन

दरम्यान, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने यापूर्वीच दुसऱ्या सत्राची परीक्षा ऑफलाइन पद्धतीने घेण्याचा निर्णय घेतला आहे. या परीक्षा दि. 10 जूनपासून सुरू होणार असून, त्यादृष्टीने विद्यापीठाच्या परीक्षा विभागाची तयारी सुरू आहे.