पुणे – स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त दक्षिण मुख्यालयाच्या वतीने विविध कार्यक्रम आणि उपक्रम राबविण्यात आले. याचाच एक भाग म्हणून तसेच शारीरिक तंदुरुस्ती आणि आरोग्य जनजागृतीला प्रोत्साहन देण्यासाठी मंगळवारी लष्करी जवानांच्या पत्नींसाठी ‘फन रन’ ही धावण्याची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.
मिल्खा सिंग स्पोर्ट्स कॉम्‍प्लेक्स (एमएसएससी) येथे ही स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत लष्करी जवानांच्या पत्नींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सर्व वयोगटातील महिलांनी यात सहभाग घेत आरोग्याबाबत जनजागृती केली.

आर्मी व्हाइव्हज वेल्फेअर असोसिएशनच्या (एडब्ल्यूडब्ल्यूए) प्रादेशिक अध्यक्षा अनिता नैन यांनी या स्पर्धेला हिरवा झेंडा दाखवत सुरवात केली. नैन यांच्या समवेत इतर ज्येष्ठ महिलांनीही यात उत्साहाने सहभाग घेतला. तर ‘फन रन’च्या या अनोख्या स्पर्धेत अन्नू कुमारी यांनी प्रथम क्रमांक पटकावला.

अधिक वाचा  पुण्यात राजकीय वातावरण तापलं; राष्ट्रवादीचे भाजपविरुद्ध मूक आंदोलन