पुणे : कामावरून काढून टाकल्याच्या रागातून कामगाराने मालकिणीला पेट्रोल ओतून जाळल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात घडला आहे. पुण्यातील वडगाव शेरी येथे हा प्रकार घडला असून या घटनेत मालकिणीसह कामगाराचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

बाला जॉनी (32) आणि मिलिंद नाथसागर  (35) असे मृत्यू झालेल्या दोघांची नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, बाला जॉनी यांचे वडगाव शेरी येथील रामचंद्र सभागृह येथे ए टू झेड टेलरिंगचे दुकान आहे. या दुकानात मिलिंद हा मागील दोन वर्षापासून काम करत होता.

मागील आठवड्यात बाला यांनी मिलिंद याला कामावरुन काढून टाकले होते. कामावरुन काढल्याचा राग मिलिंद याच्या डोक्यात होता. याच रागातून त्याने बाला यांच्या अंगावर पेट्रोल ओतून त्यांना पेटवून दिले. या घटनेत बाला आणि मिलिंद हे दोघे गंभीर जखमी झाले होते.

स्थानिक नागरिकांनी त्या दोघांना उपचारासाठी ससून हॉस्पिटलमध्ये दाखल केले. गंभीर जखमी अवस्थेत असलेल्या मिलिंद याचा पहाटे पाच वाजता उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर बाला हिचा सकाळी अकराच्या सुमारास मृत्यू झाला.

बाला ही मुळची ओडिशा राज्यातील असून मागील दहा वर्षापासून वडगाव परिसरात टेरलरिंगचा व्यवसाय करत होती. बाला ही पतीपासून विभक्त राहत होती. तिचा घटस्फोट झाला असून तिला दाहा वर्षाचा एक मुलगा आहे. तर आरोपी मिलिंद हा मुळचा परभणी जिल्ह्यातील असून तो दोन वर्षापासून बाला यांच्याकडे कामाला होता.

सोमवारी रात्री कामावरून काढल्याच्या रागातून ही धक्कादायक घटना घडली. याप्रकरणी चंदननगर पोलीस ठाण्यात मयत मिलिंद नाथसागर याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

अधिक वाचा  ठाकरेंनी 'ते' आव्हान स्विकारलं?; पुण्यात येऊन रणशिंग फुंकणार