देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी दुपारी 12 वाजता सर्व मुख्यमंत्र्यांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेणार आहेत. गेल्या एका आठवड्यापासून देशात दोन हजारांहून अधिक नवे रुग्ण आढळून येत आहेत. सर्वात मोठी चिंता राजधानी दिल्लीची आहे, जिथे दररोज 1 हजारांहून अधिक केसेस येत आहेत.

दुसरीकडे महाराष्ट्रात ही बंदिस्त ठिकाणी पुन्हा मास्कची सक्ती होण्याची शक्यता आहे. अन्य राज्यांमध्ये कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर टास्क फोर्सची बैठक घेण्यात आली. त्यावेळी टास्क फोर्समधील बहुतांश डॉक्टरांनी मास्कबाबत फेरविचार करण्याचा सल्ला मुख्यमंत्र्यांना दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. उद्या दुपारी पंतप्रधानांसोबत सर्व मुख्यमंत्र्यांची व्हीसी होणार आहे. त्यानंतर संध्याकाळी 7 वाजता मुख्यमंत्री सर्व जिल्हाधिका-यांशी संवाद साधणार आहेत.

अधिक वाचा  असं काय घडलं की मुख्यमंत्र्यांना स्वत:च्या मुलाची उमेदवारी जाहीर करता आली नाही?