‘द काश्मीर फाइल्स’ हा चित्रपट बॉलिवूडमधील सर्वोत्कृष्ट चित्रपटांपैकी एक मानला जात आहे. प्रेक्षकांनीही या सिनेमाचं भरभरून कौतुक केलं आहे. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवरही बक्कळ कमाई केली आहे. सर्वत्र ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटाची जोरदार चर्चा आहे.
अगदी सर्वसामान्य नागरिकांपासून ते राजकारणी नेत्यांपर्यंत या चित्रपटाची चर्चा सुरू आहे. हा चित्रपट काश्मिरी पंडितांवर झालेल्या अत्याचारावर आधारित आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत १७५ कोटींची कमाई केली आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांची आणि समीक्षकांची देखील मोठी पसंती मिळत आहे.
असे असले तरी देखील सिनेमाला नापसंत करणारे आणि टीका करणारे अनेक जण आहेत. सर्वसामान्य जनतेबरोबरच नेते राजकारणीही या सिनेमावर जोरदार टीका करताना दिसले. त्यापैकीच एक होते राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार. कोल्हापुरात नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमादरम्यान शरद पवार यांनी चित्रपटाच्या विरोधात बरेच काही सांगितले.
यावेळी पवारांनी चित्रपटाबद्दल सांगितलं की, धार्मिक तेढ निर्माण करण्यासाठी ‘द काश्मीर फाइल्स’ हा चित्रपट बनवण्यात आला आहे. यावरच आता चित्रपट निर्माते विवेक अग्निहोत्री यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. विवेक अग्निहोत्री यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट पोस्ट शेअर करत पवारांवर टीका केली आहे.
विवेक अग्निहोत्री यांनी ट्विटरवर पवारांच्या विधानाचा निषेध केला आणि त्यांना भारतीय राजकारणातील आजवरचा सर्वात भ्रष्ट राजकारणी हा खऱ्या आयुष्यातही सर्वात ढोंगी व्यक्ती आहे. मला आणि काश्मिरी हिंदूंना खाजगीत एक गोष्ट सांगतो आणि सार्वजनिकपणे त्याच्या विरुद्ध. कर्म… पवार साहेब… कर्म… कुणालाही सोडत नाही, असे त्यांनी ट्विटमध्ये म्हंटले आहे.
दरम्यान, विवेक अग्निहोत्री यांनी थेट शरद पवारांवर शाब्दिक हल्लाबोल चढवला आहे. यावर आता पवार काय प्रतिक्रिया देणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. यावपूर्वीदेखील विवेक अग्निहोत्री यांनी थेट पुरावे सादर करत शरद पवारांना लक्ष केलं होतं. त्यानंतर राष्ट्रवादीने देखील अग्निहोत्री यांच्यावर पलटवार केला होता.