छोट्या पडद्यावरील अतिशय हॉट आणि सुंदर अभिनेत्री म्हणून श्वेता तिवारी ओळखली जाते. तिचे बोल्ड फोटो कायमच चर्चेचा विषय ठरत असतात. पण नुकत्याच शेअर केलेल्या फोटोला कॅप्शन देत श्वेताने अप्रत्यक्षपणे ट्रोलर्सला सुनावले आहे. सध्या तिची ही पोस्ट चर्चेत आहे.

श्वेताने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये तिने लाँग गाऊन परिधान केला आहे. तसेच ती फोटोग्राफरकडे पाहून हसत असल्याचे दिसत आहे. सध्या सोशल मीडियावर श्वेताचे हे फोटो तुफान व्हायरल झाले आहेत.

श्वेताने हे फोटो शेअर करत दिलेल्या कॅप्शनने सर्वांचे लक्ष विधले आहे. तिने अप्रत्यक्षपणे ट्रोल करणाऱ्यांना सुनावले आहे. ‘वो- इतना क्या हस रही है?… हम- तेरे बाप का क्या जाता है?’ असे कॅप्शन श्वेताने दिले आहे. तिच्या या फोटोवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत. अभिनेता फहमानने कमेंट करत, ‘त्याचा बाप मजनू आहे आणि मजनू नेहमी जळत असतो अगं’ असे म्हटले आहे.

अधिक वाचा  भाजपा मोठा चमत्कारीक पक्ष, कशाचा इव्हेंट करतील याच भरवसा नाही

श्वेताने वयाची चाळीशी ओलांडली असली तरी तिचे बोल्ड फोटो नेहमीच चाहत्यांना हैराण करतात. ती मालिकांमध्ये साध्या-सरळ व्यक्तीरेखा साकरत असली तरी तिचे सोशल मीडियावरील फोटो सर्वांचे लक्ष वेधून घेतात. श्वेताची मुलगी पलक तिवारी ही देखील सध्या चर्चेत आहे.