विनोदाचा बादशाह, हुकमी एक्का अशी ओळख असणारा कुशल बद्रिके सतत चर्चेत असतो. ‘चला हवा येऊ द्या’मधील त्याचा परफॉर्मन्स तर प्रेक्षकांची मने जिंकणार असतो. त्याचा चाहता वर्ग देखील मोठा आहे. कुशल हा सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतो. त्याने नुकताच महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्यासोबतचा फोटो शेअर केला आहे. त्याने शेअर केलेला हा फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून चर्चेत आहे.

गेल्या काही दिवसांपासून राजकीय मंडळी ही अनेक कार्यक्रमांमध्ये हजेरी लावताना दिसत आहे. अशातच महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी चला हवा येऊ द्या या कार्यक्रमात हजेरी लावली. कुशल बद्रिकेने त्यांच्यासोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर करत छान असे कॅप्शन दिले आहे.

अधिक वाचा  मलिकांच्या अडचणीत वाढ, नवाब मलिकांचे डी-गँगशी संबंध' असल्याचं न्यायालयाचं निरीक्षण

कुशलने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांच्या सोबतचा फोटो शेअर केला आहे. या फोटमध्ये त्यांच्यासोबत भाऊ कदम आणि श्रेया बुगडे देखील दिसत आहेत. हा फोटो शेअर करत कुशलने, ‘लहान, मोठी गरीब, श्रीमंत माणसं वेगवेगळ्या प्रकारची असतात. पण त्यांचं हसणं मात्र सारखं असतं. असे हसणारे चेहरे एकत्र आले की जणू आनंदाचा धबधबा वाहू लागतो. आपण त्या धबधब्याचे तुषार बनुन सोबत वाहत राहायचं बास…’ असे कॅप्शन दिले आहे.

कामाविषयी बोलायचे झाले तर कुशल हा ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमातून प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसत आहे. त्याचा ‘पांडू’ हा चित्रपट काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाला होता. आता तो लवकरच ‘जत्रा २’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहात आहेत.