सध्या सर्वत्र ‘धर्मवीर’ या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरु आहे. या चित्रपटात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित झालेले, ठाण्यामध्ये शिवसेनेचं स्थान बळकट करणारे, कट्टर शिवसैनिक म्हणून ओळख निर्माण करणारे दिवंगत नेते धर्मवीर आनंद दिघे यांचा जीवनप्रवास दाखवण्यात येणार आहे. अभिनेता प्रसाद ओक या चित्रपटात आनंद दिघे यांची भूमिका साकारणार आहे. आता या चित्रपटातील एक नवे गाणे प्रदर्शित झाले आहे. या गाण्यामध्ये बाळासाहेब ठाकरे यांची झलक दाखवण्यात आली आहे. पण ही भूमिका कोणता अभिनेता साकारत आहे? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

अधिक वाचा  संभाजीराजेंच्या उमेदवारीवर फडणवीसांची प्रतिक्रिया, म्हणाले "आम्हाला का..."

सामाजिक-राजकिय क्षेत्रात असे अनेक नेते होऊन गेलेत ज्यांचं शिष्यत्व पत्करून आजही अनेकजण त्यांच्या विचारांच्या वाटेवर चालतात. राजकीय क्षेत्रातील गुरू-शिष्याची आदर्शवत ठरावी अशीच एक जोडी या महाराष्ट्राने बघितली आहे. ही जोडी म्हणजे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे! त्यांच्या आयुष्यात जे स्थान छत्रपती शिवाजी महाराजांचं होतं, जी भक्ती दुर्गामतेसाठी होती अगदी तशीच श्रद्धा बाळासाहेबांवर होती. त्यांच्या याच गुरुभक्तीचं दर्शन ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ या चित्रपटातही होणार आहे आणि याच धर्तीवरचं ‘गुरुपौर्णिमा’ हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीस आलं आहे.

‘गुरुपौर्णिमा हा गुरूचा नाही तर शिष्याचा दिवस आहे’ असे आनंद दिघे मानायचे. या दिवशी गुरुची सेवा केली की पदरी पुण्य पडतं अशी त्यांची श्रद्धा होती. आपल्या गुरूंचे चरणकमल धुण्याचा आणि पाद्यपूजा करण्याचा प्रसंग या गाण्यातून रेखाटला आहे. या गाण्यातून ‘धर्मवीर’ या चित्रपटात अभिनेता मकरंद पाध्ये बाळासाहेबांची भूमिका साकारणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

अधिक वाचा  अभिमानास्पद! अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित

चित्रपटातील गाण्यातून प्रथमच बाळासाहेबांच्या या महत्त्वपूर्ण व्यक्तिरेखेची झलक प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. प्रसाद ओक, क्षितिश दाते यांच्याप्रमाणेच बाळासाहेब ठाकरे यांची व्यक्तिरेखा साकारणाऱ्या मकरंद पाध्ये यांच्या लुकवरही रंगभूषाकार विद्याधर बट्टे यांनी घेतलेली मेहनत दिसून येते. प्रविण तरडे यांच्या लेखन दिग्दर्शनाने सजलेला धर्मवीर मु.पो. ठाणे हा चित्रपट येत्या १३ मे रोजी महाराष्ट्रभर प्रदर्शित होणार आहे.