पुणे : जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती निर्यातदार शेतकऱ्यांसाठी वरदान ठरली आहे. दरवषी येथून आंबा, द्राक्ष यासारख्या आदी फळांची निर्यात ही परदेशात केली जाते. यंदा हंगाम नसतांनाही बाजार समितीने तब्बल ११३ टन आंब्याची निर्यात ही अमेरिका, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाला निर्यात केली आहेत. यामुळे या शेतकऱ्यांनी मंदीत संधी साधली आहे.

चांगल्या प्रतीचा माल प्रदेशात निर्यात करण्यात यावा यासाठी बारामती कृषी उत्पन्न बाजारात विशेष सुविधा तयार करण्यात आल्या आहेत. या ठिकाणी रत्नागिरी, देवगड येथील हापूस तर सोलापूर आणि सांगली येथून केशर आंब्याची निर्यात होते. या वर्षी येथे फळांच्या स्कॅनींग ची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या मशीन द्वारे खराब असलेला माळ अलगद बाजूला काढला जातो. यामुळे फळांची गुणवत्ता टिकून राहते आणि चांगल्या दर्जाचा माल निर्यात होतो, असे बारामती कृषी उत्पन्न समितीचे सचिव जगताप यांनी सांगितले. या केंद्रातून १७ मार्च पासून आंबा निर्यातीला सुरुवात झाली.

अधिक वाचा  पुण्यात एजंटांनी आणखी दोघांना किडनी मिळवून दिल्याचा प्रकार उघड

सुरवातीला इंग्लड येथे माळ विमानाद्वारे जात होता. त्यानंतर अमेरिकेचे काही अधिकारी बारामती बाजार समितीत आले होते. त्यांनी येथील सुविधांची पाहणी केली. त्यानंतर या ठिकाणाहून अमेरिकेलाही आंबा निर्यात सुरु झाली आहे. शेतकऱ्यांना हापूस च्या निर्यातीत २३० रुपये, केशर च्या निर्यातीतून २०० रुपये तर बदाम आंब्याच्या निर्यातीतून १५० रुपये मिळत आहेत.