मुंबई : मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी एक व्हिडीओ ट्विट केला आहे. त्या व्हिडिओला त्यांनी ‘Do We Say Anything More’ असं कॅप्शन दिलं आहे. या व्हिडीओमध्ये नवनीत राणा आणि रवी राणा हे राणा दाम्पत्य पोलीस स्टेशनमध्ये चहाचा आस्वाद घेताना दिसत आहे. यामुळे काही दिवसांपूर्वी नवनीत राणांनी पोलिसांवर केलेल्या आरोपांबाबतच प्रश्नचिन्हं निर्माण झालं आहे.

काय म्हणाल्या होत्या नवनीत राणा
नवनीत राणा यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना एक पत्र पाठवलं होतं. मला २३ एप्रिल २०२२ रोजी खार पोलीस ठाण्यात नेण्यात आलं होतं. मी संपूर्ण रात्र पोलीस स्टेशनमध्ये काढली. मी पिण्यासाठी पाणी मागितले. मात्र मला रात्रभर पाणीही देण्यात आलं नाही. पाणी मागितल्यामुळे मला जातीवाचक शिविगाळ केली गेली. मी अनुसूचित जातीची असल्यानं मला प्यायला रात्रभर पाणीही दिलं गेलं नाही. यामुळे मला पिण्याच्या पाण्याचा मुलभूत हक्कही नाकारण्यात आला होता.

अधिक वाचा  परिवहन मंत्री अनिल परब यांच्या पुणे आणि मुंबईतील 7 ठिकाणांवर छापे, ईडीची मोठी कारवाई

अशा आशयाचं पत्र खासदार नवनीत राणा यांनी ओम बिर्ला यांना लिहिलं होतं. या प्रकरणी भाजपही आक्रमक झालेला पाहायला मिळाला. भाजपने याविरोधात रान उठवलं होतं. मात्र आता मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी हा व्हिडीओ ट्विट केल्यानंतर नवनीत राणा यांच्या दाव्यात किती खरेपणा आहे हे पाहायला मिळतंय. Do We Say Anything More हे वाक्य खासदार महोदयांच्या दाव्यात किती सत्यता आहे हे सांगण्यासाठी पुरेसं आहे.

खासदार नवनीत राणा यांनी केलेल्या तक्रारीसंदर्भात चौकशी केली असून त्यामध्ये वस्तुस्थिती नाही, तरीसुद्धा लोकसभा अध्यक्षांनी माहिती मागवली आहे, तर ती माहिती राज्यसरकार देईल अशी माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या आरोपावर बोलताना गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी पोलीस कायद्यानेच काम करत असून कायद्याच्या बाहेर कोणतेही काम करत नाहीत. मुंबई पोलीस उत्तम काम करत असून कायद्याप्रमाणे त्यांना जे योग्य वाटते, त्यावर ते कार्यवाही करत आहेत अशा शब्दात मुंबई पोलिसांच्या कामाबाबत पाठ थोपटली.

अधिक वाचा  कौटुंबीक हिंसेचे आरोप असणाऱ्या करण मेहराकडून खळबळजनक खुलासा, मुलाखतीत हे सांगितले