मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर आता राज्यात राजकीय आरोप-प्रत्यारोप होताना पाहायला मिळत आहे. सोमय्यांच्या हल्ल्यावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी त्यांनी सॉस लावून जखम तयार केली असल्याचा आरोप केला तर आता त्यांच्या याच टीकेला भाजप नेते किरीट सोमय्या यांनी उत्तर दिले आहे.यातच शिवसेना नेत्या दिपाली सय्यद यांनी समर्थन केलं आहे.

शिवसेना नेत्या दिपाली सय्यद पत्रकरांशी बोलतांना म्हणाल्या,’बाळासाहेबांची शिकवण आहे, जो नडला त्याला फोडला. जर तिथं त्या कारमध्ये जर मोदीही असले असते ना तर त्या कारला तसंच फोडलं असतं.’ असं म्हणत सय्यद यांनी या हल्याचा समर्थन केलं आहे.

अधिक वाचा  कंगनाची 'धाकड' गिरी फुस्स..; आठवड्यात फक्त २० तिकीटांतून 4 हजार 420 रुपयांची कमाई

त्या पुढे म्हणल्या,’त्या दिवशी मुंबईच्या रस्त्यावर शिवसैनिक होता हे बाळासाहेबांचे शिवसैनिक आहेत’ असं ही सय्यद म्हणाल्या आहे.

दरम्यान, आज खार पोलीस स्टेशनमध्ये किरीट सोमय्या यांनी हजर होत मुंबई पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. सोमय्या यांनी,”पोलिसांनी दाखल केलेली एफआयआर खोटी असल्याचे सांगत याविरोधात तक्रार करण्यासाठी किरीट सोमय्या खार पोलीस स्थानकात पोहोचले. ‘त्या एफआयआरवर मी सही केलेली नाही. त्या एफआयआरवरील सही बनावट असल्याचा दावा सोमय्या यांनी केला आहे. राज्य सरकारने बनावट एफआयआर दाखल केली असून सरकारची बनवाबनवी पकडली गेली आहे’, असेही सोमय्या म्हणाले आहेत.