उंड्री: उन्हाचा कडाका वाढला आहे, अंगाची लाही लाही होत आहे. शाळा-महाविद्यालातील विद्यार्थ्यांबरोबर कामगारवर्ग बसथांब्यावर शेड नसल्याने उन्हाच्या कडाक्यात उभा राहून बसची प्रतिक्षा करीत आहे, तर अधिकारी मात्र थंडगार चेंबरमध्ये बसत असल्याची तीव्र संतापजनक भावना प्रवाशांनी व्यक्त केली.

हडपसरमधील मंत्री मार्केटसमोरील महंदवाडी, उंड्री, पिसोळी, होळकरवाडी, हांडेवाडीकडे, तर मार्केटच्या समोर शहराकडे जाणाऱ्या बसचायेथील बसथांब्यावर शेड नसल्याने प्रवासी उन्हात उभे असतात. पीएमपी प्रशासनाचे अधिकारी या मार्गावरून जातात. मात्र, महागड्या थंडगार गाड्यांमधून जाताना उन्हात तिष्ठत उभे राहिलेले, शाळकरी मुले, महिला, ज्येष्ठ नागरिक, अपंग दिसत नसतील, अशी खोचक टिपण्णी धनंजय हांडे, संतोष गोरड, खंडेराव जगताप, विश्वास कदम या प्रवाशांनी दिली.

अधिक वाचा  "आता मी एका राखीनं..."; लता मंगेशकर यांच्या भावाला मोदींनी पाठवलं भावनिक पत्र

दरम्यान, बसथांब्यावर उन्हापासून संरक्षण करण्यासाठी पालिका प्रशासनाने शेड उभारावे, अशी मागणी करणारे निवेदन शिवसेनेचे महेंद्र बनकर यांनी दिले आहे.बसथांब्यावर शेड नसल्याने उन्हात थांबायचे, बस वेळेवर येत नाही, बसमध्ये खच्चून गर्दी असल्याने बसायला जागा मिळत नाही. सुट्या पैशांसाठी वाहक अंगावर खेकसतात. प्रशासनाने बसथांब्यावर उन्हाथ थांबून, बसमध्ये उभे राहून प्रवास करणाऱ्यांसाठी तिकीट दर तरी कमी केला पाहिजे.