मुंबई: भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर दोन वेळा झालेल्या हल्ल्यानंतर दिल्लीत सीआयएसएफच्या हेडक्वार्टरने घेतली गंभीर दखल घेतली आहे. सुत्रांच्या माहितीनुसार किरीट सोमय्या यांच्यावर पुन्हा हल्ला झाला तर शुट एट साईटचे आदेश देण्यात येणार आहेत. झेड सुरक्षा दिलेल्या व्यक्तीच्या ताफ्यावर दुसऱ्यांदा हल्ला झाल्याने मुंबई पोलिसांकडे याबाबत जाब विचारला गेला. मुंबईच्या पोलीस आयुक्तांशी सीआयएसएफचे कमांडर यांनी बातचीत केल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. घडलेल्या घटनेनंतर किरीट सोमय्या यांच्या जवानांना प्रत्येक कार्यक्रमात अतीदक्ष राहून काम करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

केंद्र सरकार पाठिशी -अपक्ष आमदार रवी राणा आणि अपक्ष खासदार नवनीत राणा यांची भेट घेण्यासाठी भाजप नेते किरीट सोमय्या खार पोलीस ठाण्यात गेले होते. किरीट सोमय्या खार पोलीस ठाण्यात गेल्याने शिवसैनिक आक्रमक झाले होते. यावेळी शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली. शिवसैनिकांना बाजूला करुन किरीट सोमय्यांची गाडी तिथून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, यादरम्यान एका शिवसैनिकांनं गाडीवर दगड भिरकावल्याने गाडीची काच फुटली. किरीट सोमय्या या घटनेत किरकोळ जखमी झाले होते. त्यांच्या चेहऱ्याला थोडीशी दुखापत झाली आहे. पंचनामा होत नाही तोपर्यंत किरीट सोमय्यांनी गाडीतून खाली उतरणार नसल्याची भूमिका घेतली होती. किरीट सोमय्यांनी या घटनेनंतर धक्का बसला. सोमय्यांनी या घटनेनंतर भाजप नेत्यांशी चर्चा देखील केली होती. दरम्यान, सोमय्या यांनी दुसऱ्याच दिवशी केंद्रीय गृहसचिव यांची भेट घेऊन शिवेसेनेच्या गुंडांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली होती

अधिक वाचा  पुण्यात दिवसाढवळ्या सराफा व्यापाऱ्यावर सशस्त्र हल्ला

या हल्लाचं संजय राऊतांनी मात्र समर्थन केलं होतं. राऊत म्हणाले की, आयएनएस विक्रांतच्या (INS Vikrant) निधीचा अपहार करणारा आरोपी. बोगस जात प्रमाणपत्र वापरून निवडून आलेल्या दुसऱ्या आरोपीला भेटायला जातो. लोकांच्या भावना तीव्र होतात. देशाशी बेइमानी करणाऱ्या चोरांवर दोन दगड पडले तर भाजपला (BJP) इतके तळमळ मळमळ करण्याचे कारण काय? Ins vikrant घोटाळा देशद्रोह आहे! अशा आशयाचे ट्विट संजय राऊत यांनी केले होते. मात्र आता सोमय्यांच्या सुरक्षेसाठी केंद्र सरकार अधिक गंभीर झाल्याचे दिसत आहे.