पुणे : आगामी महानगरपालिका निवडणूकी मध्ये भाजप मनसे युती होणार का हा सर्वांना प्रश्न पडत आहे. त्यावर आगामी निवडणुकीमध्ये भाजप आणि मनसेची युती होणार का असा सवाल चंद्रकांत पाटील यांना पत्रकारांनी विचारला असता मनसे बरोबर युती करायची की नाही याचा निर्णय केंद्रात होईल. त्यांच्या अमराठी बाबत निर्णय घ्यावा लागेल. असी माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष व आमदार चंद्रकांत पाटील यांनी पुण्यात पत्रकारांना दिली.आज पुण्यात पुणे महानगरपालिकेच्या भाजपच्या कार्य अहवाल प्रकाशन सोहळा पार पडला त्या कार्यक्रमाला चंद्रकांत पाटील यांनी उपस्थिती लावली त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
तुमचं हिंदुत्व हे अजानवालं आहे, सावरकरांना समलिंगी म्हणल्यावर शांत बसणारे आहे, सत्ता इतकी वाईट असते हे मला माहित नाही असं वक्तव्य भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. मुख्यमंत्र्यांचे भाषण आक्रमक की आक्रस्ताळेपणाच? त्यांना कोणाबद्दल बोलायचंय हे माहित नाही. पण देशांतल्या हिंदूना माहिती आहे की बाबरीसाठी कोण होतं, कोणी गोळ्या झेलल्या. तुमचं हिंदुत्व हे अजान वालं आहे.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका करताना ते म्हणाले की, पवारांनी स्वत:चा इतिहास चेक करावा. परवाचे पवारांचे भाषण माझ्याशिवाय संपलं नाही. पवारांच्या वक्तव्यावर आम्ही आदर करतो. पण त्यांनी पक्ष सोडले, त्यांना भाजपही चालली. मी लढलो आणि हरलो तर हिमालयात जाईन असं म्हणलं होतं. पवार म्हणाले होते कॉंग्रेसमध्ये गेलो तर अंगाला राख फासून घेईल. असे चंद्रकांत पाटील म्हणाले.
अमोल मिटकरींच्या दोन क्लिप व्हायरल होत आहेत. त्यांनी बघायचं नाही हे ठरवलंय. बाळासाहेबांची आणि आदित्यची काय नक्कल केली आहे अमोल मिटकरींनी, असाही टोला चंद्रकांत पाटील यांनी लगावला.मुख्यमंत्र्यांना सभा घ्यायला कोणी अडवलंय असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. ते म्हणाले की, या सगळ्या मागे आम्ही आहोत असं वाटतं असेल तर फसवून पदरात पाडलेले सरकार तुमच्याकडे आहे. गृहमंत्री तुमच्याकडे आहे. सर्व प्रकरणाचा तपास करा.