नाशिक : खासदार नवनीत राणा मागासवर्गीय आहेत म्हणून त्यांना पोलिसांनी पाणी दिले नाही, या दाव्याची राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी खिल्ली उडवत पोलखोल केली. ते म्हणाले, सरकारमध्ये व पोलिसांत मागासवर्गीय नाहीत का?. राणा मागासवर्गीय आहेत की नाही हा विषय तर न्यायालयात गेलेला आहे.

खासदार नवनीत राणा यांच्यासह भाजप नेते किरीट सोमय्या यांचा खास शैलीत समाचार घेताना, पालकमंत्री छगन भुजबळ यांनी, खासदार नवनीत राणा मागासर्गीय आहेत का, त्यांचा विषय तर न्यायालयात प्रलंबित आहे. तसेच पोलिसांनी मज्जाव केला असताना किरीट सोमय्यांनी हट्ट का धरला आदी प्रतिप्रश्न उपस्थित केले.

अधिक वाचा  धक्कादायक : पाच महिलांचा भाटघर धरणात बुडून मृत्यू |

महापालिकेच्या आढावा बैठकीनंतर पत्रकार परिषदेत ते बोलत म्हणाले, की न्यायालयीन कोठडीत असलेल्या खासदार नवनीत राणा यांनी आपण मागासवर्गीय असल्याचा उल्लेख केला आहे व यामुळे योग्य वागणूक मिळत नसल्याचा आरोपदेखील त्यांनी केला आहे.

त्याविषयी भुजबळ म्हणाले, की त्या नेमके मागासवर्गीय आहे की नाही याबाबत प्रश्नचिन्ह आहे. म्हणून उच्च न्यायालयापासून तर सर्वोच्च न्यायालयापर्यंत हा विषय पोचला आहे. आमच्या सरकारमध्येही मोठ्या प्रमाणात मागासवर्गीय आहेत, पोलिसांत आहेत, असा टोलाही त्यांनी लगावला.

कुठे हल्ला झाला?

भारतीय जनता पक्षाचे नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांच्यावरील हल्ल्यासंदर्भात विचारता, कुठे हल्ला झाला, असा उलटप्रश्न केला. त्यांच्या घरावर हल्ला झाला का, असा प्रश्न करून पोलिसांनी त्यांना पोलिस ठाण्यात जायला अनुमती दिली नव्हती तसेच त्यांनी हट्ट धरून तिकडे जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी सूचना केली होती की वातावरण तंग आहे अशा वेळेला आपण येऊ नये तरीही किरीट सोमय्या यांनी हट्ट धरला. ते सतत फोनवर बोलत होते. ते मुद्दाम त्या ठिकाणी गेले का, अशी शंकाही भुजबळ यांनी व्यक्त केली