शहीद भगतसिंग विचारमंचातर्फे आयोजित सातवा नास्तिक मेळावा काल रविवारी (२४ एप्रिल) पुण्यात पार पडला. या संमेलनात चित्रपट दिग्दर्शक सुनील सुकथनकर, वकिल आणि मानवाधिकार कार्यकर्ते अॅड. असीम सरोदे आणि लेखक तुकाराम सोनवणे हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते. तर यावेळी बोलताना सर्व वक्त्यांनी अंधश्रद्धा आणि नास्तिकता या विषयावर आपले मत मांडले.

यावेळी संमेलनादरम्यान बोलताना दिग्दर्शक सुनील सुकथनकर यांनी धार्मिक क्षेत्रातील लोकच अधिक नास्तिक असतात, असे मत व्यक्त केले आहे. त्यांनी म्हटले की, ‘देवाच्या दर्शनासाठी अधिक पैसे मोजणाऱ्यांना आधी दर्शन दिलं जातं. हे न समजणाऱ्या देवांना असहाय्य कोणी केलं? मुळात असे उपक्रम राबविणारे धार्मिक क्षेत्रातील लोकच अधिक नास्तिक असतात’. ‘बहुसंख्याच्या धर्माला प्रश्न विचारतात म्हणून नरेंद्र दाभोलकर यांची हत्या करण्यात आली. पण वैज्ञानिक दृष्टीकोण आपल्याला नको आहे का?’

अधिक वाचा  सारसबाग चौपाटी वारंवार नियम उल्लंघन; सर्व ५३ दुकानांना सील

सुनील कथनकर पुढे म्हणाले की, ‘कला क्षेत्रात तर अंधश्रद्धेचा सुकाळ आहे. मी स्वतःला नास्तिक समजत असलो तरी चित्रीकरणापूर्वी पूजा करणाऱ्यांचे मन दुखावू नये, ही सहिष्णुता माझ्याकडे आहे. वैचारिकदृष्ट्या स्वतंत्र असणारा माणूस खरा सहिष्णुभाव जपू शकतो’.

यावेळी मानवाधिकार कार्यकर्ते अ‍ॅड. असीम सरोदे यांनी सध्या महाराष्ट्र राजकारणात हनुमान चालिसा आणि भोंग्यांबद्दल सुरू असलेल्या वादावर आपली भूमिका मांडली. त्यांनी म्हटले की, ‘हनुमान चालिसा म्हणायचा आहे तर स्वतःच्या घरात म्हणा, हवे तर स्वतःच्या अंगणात म्हणा. दुसऱ्याच्या दारात जाऊन हनुमान चालिसा म्हणण्याचा हट्ट का, असा सवाल त्यांनी केला. तसेच दुसऱ्याच्या दारात हनुमान चालिसा म्हणण्यात देव नाही, तर राजकारण आहे’.

अधिक वाचा  'हाच फडणवीस तुमच्या सत्तेच्या (बाबरी) ढाच्याला खाली केल्याशिवाय राहणार नाही'

‘आज देवाच्या नावाने अविचाराचे दर्शन सुरू आहे. यातून गुंड बदमाशांचं राजकारण प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्याला आपण विरोध करतो म्हणूनही काही लोकांचा नास्तिक मेळाव्याला विरोध आहे. देव ही संकल्पना अनेकांच्या राजकारणाचं भांडवल आहे’, असेही असीम सरोदे यांनी यावेळी म्हटले.