मुंबई : हनुमान चालिसावरुन सुरु असलेल्या वादात रोज नवनवीन घडामोडी घडत आहेत. यावरून दैनिक सामानाच्या अग्रलेखातून भाजप  पक्ष व खासदार नवनीत राणा  यांच्यावर टीका करण्यात आली आहे.

संसदेत श्रीरामाच्या नावे शपथ घेणाऱ्यांना नवनीत राणा यांनी विरोध केला. त्याच बाई आज हनुमान चालिसा वगैरे विषयांवर हिंदुत्वाची पिपाणी वाजवतात आणि समस्त भाजप नाच्या पोरांसारखा त्या बाईच्या इशाऱ्यावर नाचतो, हे आश्चर्यच आहे, असे सामनातून बोलण्यात आले आहे.

तसेच मातोश्रीवर हनुमान चालिसा वाचण्याचा अट्टाहास कशासाठी? असा सवालही उपस्थित करण्यात आला आहे. राणा दाम्पतायाला पुढे करुन मुंबईत वातावरण बिघडवायचे हेच ठरवलं होतं आणि त्याबरहुकूम सगळं घडलं, असा आरोप सामना अग्रलेखातून करण्यात आला आहे.

अधिक वाचा  श्रीगोंद्यात काॅंग्रेस - राष्ट्रवादी आघाडी दुभंगणार? राहुल जगताप यांच्या हाती सुत्रे

अमरावती लोकसभा हा राखीव मतदारसंघ आहे. निवडूक लढवण्यासाठी नवनीत कौर राणा यांनी अनुसूचित जातीचं खोटं प्रमाणपत्र तयार केले. या फसवणुकीवर मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) शिक्कामोर्तब केलं. पण सर्वोच्च न्यायालयात हे प्रकरण नेऊन वेळकाढूपणा चालवाल्याचाही आरोप सामना अग्रलेखातून केला गेला आहे.

दरम्यान, आमदार रवी राणा (Ravi Rana) आणि नवनीत राणा यांची आज जेलमध्ये रवानगी करण्यात आली आहे. रवी राणा यांची तळोजा रोड जेलमध्ये रवानगी करण्यात आली असून नवनीत राणा यांची आर्थर रोड जेलमध्ये रवानगी करण्यात आली आहे.