हडपसर : पराभवाने खचून न जाता पाच वर्ष होले दाम्पत्याने जनतेची सेवा केली,या कामाची पावती जनता येत्या मनपा निवडणुकीत त्यांना देईल असा विश्वास भाजपा हडपसर विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष संदीप दळवी यांनी सातववाडी येथे बोलताना दिला.

भाजप ओबीसी मोर्चा पुणे शहर सरचिटणीस नितीनतात्या होले यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा सप्ताहाचे आयोजन आत्मप्रभा फाउंडेशन व मित्रपरिवाराकडून करण्यात आले आहे.भारतीय डाक विभागाच्या सहकार्याने सातववाडीमध्ये आधारकार्ड आपल्या दारी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून संदीप दळवी हे बोलत होते.

यावेळी नगरसेविका उज्वला जंगले, पुणे शहर भाजप उपाध्यक्ष,माजी सभापती भूषण तुपे,जनसेवा बँकेचे संचालक भाजप नेते रवी तुपे,माजी विधानसभा अध्यक्ष सुभाष जंगले,हडपसर विधानसभा संघटनमंत्री गणेश घुले,भाजप युवा मोर्चा शहर उपाध्यक्ष ऍड प्रमोद सातव, भाजप हडपसर व्यापार आघाडीच्या महिला अध्यक्ष सविता हिंगणे, भाजप नेते आकाश डांगमाळी,युवराज मोहरे, आत्मप्रभा फाउंडेशनच्या अध्यक्ष जनसेविका शिल्पाताई होले,युवा मोर्चाचे पदाधिकारी गणेश सोरटे,वामन पुजारी,मयूर कामठे,अनिकेत जाधव यांच्यासह नागरिक,महिला,युवा कार्यकर्ते उपस्थित होते.सेवा सप्ताहामध्ये आयोजित केलेल्या आजच्या शिबिरात आधार कार्ड,इ श्रमिक कार्ड,3 लाखांचा विमा काढणे,मोफत वोटर स्मार्ट कार्ड,कोविड युनिव्हर्सल पास आदी मोफत सुविधा घेण्यासाठी सातववाडी व गोंधळेनगर परिसरातील नागरिकांनी चांगलीच गर्दी केली होती.

अधिक वाचा  संभाजीराजेंनी मुंबई पहाटेच सोडली; शिवसेनेची ऑफर धुडकावली?

उपस्थित मान्यवर नेत्यांनी या सर्व उपक्रमांचे कौतुक करत नितीनतात्या होले व शिल्पाताई होले या उभयतांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

शिबिर यशस्वी होण्यासाठी योगेश गारडे, अक्षय टिळेकर,शाहरुख सय्यद,नितीन लोणकर,राज घोलप,साहिल रासकर,राहूल शेटे,ओंकार पाखरे,अनिकेत थोरात,निलेश राऊत, रुपेश गोडसे, उमेश हरिहर,माऊली सूर्यवंशी, सलमान सय्यद, भाऊ पांढरे, धनंजय नवले, अनिल शेवते, जीवन शेडगे, गणेश काळे, राजु कांबळे, सचिन लोणकर, सोन्या कामत यांच्यासह नितीन तात्या होले मित्रपरिवार व आत्मप्रभा फाउंडेशनच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.