मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर झालेल्या हल्ल्यामुळे सध्या राजकीय वातावरण तापले आहे. यामुळे महाविकास आघाडी आणि भाजप नेत्यांमधील आरोप-प्रत्यारोप सध्या वाढत असून राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी गंभीर टीका केली आहे.

राज्यात सध्या राजकीय वातावरण तापले असून एकीकडे किरीट सोमय्या यांच्यावर झालेला हल्ला तर दुसरीकडे नवनीत राणा आणि रवी राणा यांना झालेली अटक यामुळे सध्या खळबळ सुरू आहे. अशात भाजप आणि महाविकासआघाडी असा एकच वाद पाहायला मिळतो. यावरून सध्या आरोप-प्रत्यारोपही सुरू आहेत. यात अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनीही किरीट सोमय्या यांच्यावर घणाघाती टीका केली आहे.

अधिक वाचा  धक्कादायक : पाच महिलांचा भाटघर धरणात बुडून मृत्यू |

खरेतर किरीट सोमय्या यांना पोलिस स्टेशनमध्ये जाण्याची काहीच गरज नव्हती अशी टीका छगन भुजबळ यांनी केली आहे. यावेळी बोलताना त्यांनी किरीट सोमय्या यांना झालेल्या जखमेवरही भाष्य केले आहे. त्यांना जर हनुवटीला लागले होते तर जखमेतून रक्त ओघळायला हवे होते, ते रक्त पुसायला हवं होतं’ असेही छगन भुजबळ म्हणाले. ते माध्यमांशी बोलत असताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.

इतकेच नाही तर त्यांनी नवनीत राणा आणि रवी राणा यांच्या ‘मातोश्री’बाहेर हनुमान चालिसा पठण करण्याच्या चॅलेंजवरही वक्तव्य केले. राणा दाम्पत्याला जर ‘मातोश्री’वर हनुमान चालिसा पठण करायचे होते तर त्यांनी परवानगी घेऊन यायला हवे होते.

अधिक वाचा  संभाजीराजे शिवसेना पुरस्कृत म्हणून राज्यसभेत; संभाजीराजे यांची मागणी अखेर मान्य

एकदा बाळासाहेब ठाकरे यांना भेटण्यासाठी काही मुस्लिम धर्मगुरू आले होते. त्यावेळी नमाज पढण्याची वेळ झाली होती. त्यामुळे बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांना एक खोली दिली आणि नमाज पढण्याची परवानगी दिली. त्यांचे नमाज पढून झाल्यानंतर आपण चर्चा करू असेही त्यावेळी बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते. त्यामुळे हनुमान चालिसावरून राज्यात घाणेरडे राजकारण सुरू असल्याची टीका भुजबळांनी केली आहे.