मुंबई – राज्यात सध्या किरीट सोमय्या आणि राणा दाम्पत्यांमुळे जोरदार खळबळ उडाली आहे. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधी पक्षामध्ये आरोप-प्रत्यारोपांचा कलगितुरा रंगला आहे.

भाजपकडून आता राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली जात आहे. त्यामुळे आणखी एका नव्या वादाला तोंड फुटलं आहे.राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली जात असतानाच आता राष्ट्रपती काॅंग्रेसच्या नेत्याच्या ट्विटनं खळबळ उडवली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी राष्ट्रपती राजवट लावा, असे ट्विट केलं आहे.

राणा दाम्पत्यांना अटक केल्यानंतर भाजप नेते किरीट सोमय्या हे राणा दाम्पत्याला भेटण्यासाठी गेले होते. परंतु, शिवसैनिकांनी यावेळी त्यांच्या गाडीवर हल्ला केला.या हल्ल्यानंतर भाजप पेटून उठलं आहे आणि राष्ट्रपती राजवटीची मागणी करत आहे. मात्र जितेंद्र आव्हाड यांनी अचानक केलेल्या ट्विटनं सगळ्यांनाच धक्का दिला आहे.

अधिक वाचा  ब्राह्मण महासंघाने सांगितली पवारांसोबतच्या बैठकीचं आमंत्रण नाकारण्याची कारणं..

राज्यात कायदा सुव्यवस्था नसल्याचा आरोप करत भाजपने राष्ट्रपती राजवटीची मागणी केली आहे. त्यामुळे आता पुढे काय होणार हे पाहणं अधिक महत्त्वाचं ठरणार आहे.

विरोधक राज्यात राष्ट्रपती लाजवट लावण्याची मागणी करत असले तरी राष्ट्रपती राजवट लागू होणार नाही असे जयंत पाटील यांनी म्हटलं होतं.