मुंबई – आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा या राणा दाम्पत्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानासमोर जाऊन हनुमान चालिसा पठण करणार असल्याची घोषणा केली होती. यानंतर शिवसेना जोरदार आक्रमक झाली.हनुमान चालीसा पठन प्रकरणावरुन मुंबईत जोरदार राडा पहायला मिळाला. त्यांनंतर नवनीत राणा आणि रवी राणा तुरुंगात रवानगी करण्यात आली आहे. दोघांनाही वांद्रे न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.

तुरूंगात रवानगी करण्याअगोदर आता त्यांचं मेडिकल चेकअप करण्यात येत आहे. त्यामुळे आता कोरोना चाचणीमुळे तुरुंगात न्यायला उशीर होणार आहे.नवनीत राणा आणि रवी राणा यांना भायखळा कारागृहात ठेवण्यात आलं आहे. मात्र तुरुंगात रवानगी होण्याअगोदरच नवनीत राणा यांची प्रकृती खालावल्याचं समोर आलं आहे.

अधिक वाचा  ठाकरेंनी 'ते' आव्हान स्विकारलं?; पुण्यात येऊन रणशिंग फुंकणार

नवनीत राणा यांचं मेडिकल चेकअपमधे ब्लड प्रेशर वाढलेले आढळलं. सध्या त्या भायखला कारागृहाच्या रुग्णालयात दाखल असल्याची माहिती आहे.नवनीत राणा यांच्या प्रकृतीमुळे सध्या टेंशन वाढलं आहे. दुसरीकडे रवी राणा यांना घेऊन पोलीस मुंबईतील तळोजा कारागृहात पोहचले आहेत.

राणा दाम्पत्य प्रकरण आणि नंतर भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या घरावरील हल्ला प्रकरणानंतर आता वातावरण चांगलंच तापल्याचं पहायला मिळत आहे.राणा दाम्पत्यांमुळे शिवसैनिकांनी आक्रमक पवित्र घेतला आहे. राणा दाम्पत्यांच्या तुरुंगाबाहेरही शिवसैनिकांनी घोषणाबाजी करायला सुरुवात केली आहे.