मुंबई : मागील काही दिवसांपासून राज्यातील राजकीय वातावरण अनेक घडामोडी घडल्या आहेत. राज्याच्या राजकारणात मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी पक्ष बांधणीसाठी चांगलीच कंबर कसली असल्याचे चित्र आहे. मशिदीवरील भोंगे काढण्यावरून राज ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकारला धारेवरं धरलं आहे. आज उपमुख्यमंत्री, गृहमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली असून यासाठी मनसेकडून तीन पदाधिकारी जात आहेत. यात मनसे नेते बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई आणि संदीप देशपांडे यांचा समावेश असणार आहे. राज्य सरकारने बोलवलेल्या या बैठकीकडे भाजपानेही फिरवली पाठ असून भाजपाचा कोणताही नेता या बैठकीत सहभागी होणार नाही, अशी माहिती मिळत आहेत. भोंग्यवरून राजकीय वातावरण तापत असताना सरकारने सर्वपक्षीय बैठक बोलवली असून भाजपने यापासून दूर राहणे पसंद केलं आहे. दरम्यान, आता बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, संदीप देशपांडे दाखल झाले आहेत.

अधिक वाचा  पुण्यात आता सीएनजी ८० रुपये; तीन दरात चौथी 2 रुपये 70 पैशांची वाढ

मशिदीवरील भोंगे उतरवण्यासाठी मनसेप्रमुख राज ठाकरेंनी ३ तारखेपर्यंतचं अल्टीमेटम दिला आहे. यावर मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राज ठाकरेंनी ३ तारखेपर्यंत राज्य सरकारला अल्टीमेटम दिला असल्याचे मनसेची भूमिका बदलण्याचा प्रश्न नाही. राज ठाकरे यांच्या आधीच काही मुलाखती आणि भेटीगाठी असल्याने त्यांनी या बैठकीची जबाबदारी आमच्यावर दिली आहे. सध्या दोन-चार दिवसांत घडणाऱ्या घटना बघितल्या तर कायदा-सुव्यवस्था बिघडवण्याचं काम राज्य सरकारच करतं असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला आहे. असं असलं तरी राज ठाकरे यांची संभाजीनगरची सभा उत्तम प्रकारे होईल याची आम्हाला खात्री, असंही ते म्हणाल आहेत.

अधिक वाचा  शिवसेनेची संभाजीराजे छत्रपती यांना जागा; त्यापेक्षा शिवसेना काय करु शकते - संजय राऊत

दरम्यान, पाडवा मेळव्यात राज ठाकरे यांनी घेतलेल्या मशिदिवरील भोंग्यावरुन घेतलीली भूमिका चांगलीच गाजली आणि राज्यभर त्याचे पडसाद पाहायला मिळाले. आता राज ठाकरे यांनी ठाण्यातील उत्तर सभेत बोलताना सरकारला भोंगे उतरवण्यासाठी ३ तारखेपर्यंत अल्टिमेटम दिला. हा धार्मिक विषय नसून सामाजिक विषय आहे असे सांगत आमची भूमिका मागे घेणार नसल्याचही त्यांनी यावेळी स्पष्ट केले होतं.