मुळशी रिहे: दि. २४ एप्रिल २०२२ रोजी  रिहे गावात ग्रामसभा आयोजित करण्यात आली.सदर सभेत शाळेतील लहान मुलांना येणाऱ्या अडचणी व या अडचणींवर उपाय योजना याबाबत चर्चा करण्यात आली.गावातील महिलांना व युवकांना व्यवसाय प्रशिक्षण देण्यासंदर्भात मार्गदर्शन श्री सुरेश पाटील सर यांनी केले (प्रतिनिधी प्रशिक्षण केंद्र मांजरी). गावातील शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पिक विमा योजनेची माहिती कृषी खात्याचे अधिकारी व्ही.एस. काळभोर यांनी दिली.

ग्रामसेवक सौ. सारिका टाकळकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. आणि सदर सभेत प्रभारी सरपंच सौ सुरेखा प्रवीण पडळघरे, अनिल मोरे, भूषण बोडके, नवनाथ ओझरकर, शेखर शिंदे, ज्योती खेंगरे, दिपाली पडळघरे, सायली शिंदे, रेखा शिंदे,सचिन भोसले, अशोक पडळघरे उपस्थित होते.

अधिक वाचा  जेजुरी गड तीर्थक्षेत्र विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्याच्या कामास मान्यता~मुख्यमंत्री उद्धव ठाकरे