पुणे : उत्पादनवाढीसाठी  शेती व्यवसयात नवनवीन प्रयोग करणे ही काळाचा गरज झली आहे. असेच प्रयोग घेऊन आता तरुण शेतकरी या व्यवसयात पदार्पण करीत आहेत.

पारंपारिक शेतीला फाटा देत जिल्ह्यातील भोरमधील माळवाडी शिवारात किरण यादव या तरुण शेतकऱ्याने अनेकांना आशेचा किरण मिळेल असाच प्रयोग केला आहे. एसआरटी म्हणजेच शून्य मशागत शेतीचा हा प्रयोग केला आहे. यामुळे उत्पादनात वाढ तर झालीच आहे पण खर्चही कमी होत आहे. किरणचा हा अत्याधुनिक उपक्रम पाहण्यासाठी परदेशी पाहुणे थेट बांधावर दाखल झाले होते. किरण यांनी केलेल्या अभिनव उपक्रमामुळे त्यांना शासनाकडूनही अनेक पारितोषिके मिळाली असून आता या भागातील शेतकऱ्यांसाठी त्यांचा हा प्रयोग नवसंजीवनी ठरत आहे.

अधिक वाचा  भाजपने राजकारणाचा स्तर घालवला, "आता किमान..."; रोहीत पवारांची भाजपवर टीका

काय आहे शून्य मशागती शेती?

दिवसेंदिवस उत्पादनावरील खर्च वाढत आहे. शिवाय खर्च करुनही पीक पदरी पडेल असे सांगता येत नाही. त्यामुळे उत्पादनावर खर्च करुन अधिकचे उत्पादन पदरी पाडून घेणे हा एकमेव पर्याय शेतकऱ्यांकडे आहे. त्याच अनुशंगाने माळवाडी येथील किरण यादव यांनी एस.आर.टी म्हणजेच शून्य मशागत शेती असे आधुनिक तंत्रज्ञान वापरुन उत्पादन घेण्यास सुरवात केली आहे. यामुळे उत्पादनावरील खर्चात बचत होत आहे. शिवाय यंत्राच्या सहाय्याने शेती होत असल्याने सर्व काही जिथल्या तिथे. त्यामुळे शेतीचे रुपडेच बदलत आहे. यामुळे आता उत्पादनातही वाढ होत असून पंचक्रोशीतील शेतकऱ्यांसाठी हा प्रयोग प्रेरणादायी ठरत आहे.

अधिक वाचा  'जेवढ्या शांततेत भोंगे उतरवले तेवढ्याच शांततेत...', किरण माने यांची संदेश देणारी पोस्ट चर्चेत

पुण्यातील भोरमधील माळवाडी गावातील प्रगतशील शेतकरी किरण यादव यांनी एसआरटी पद्धतीने, आधुनिक तंत्रज्ञान वापरून केलेली यशस्वी शेतीची पाहणी करण्यासाठी परदेशी अभ्यासकांनी भेट दिली.यावेळी बारामती कृषी विज्ञान केंद्राचे अधिकारी डॉक्टर संतोष भोसले आणि डॉक्टर विवेक भोईटे उपस्थित होते.कृषी विज्ञान केंद्राकडून शून्य मशागत शेती मार्गदर्शन आणि शिवार भेट दौरा आयोजित करण्यात आला होता. यामुळे येथील प्रगतशील शेतीचे उदाहरण आता जगभर दिले जाणार आहे. शिवाय या भागातील शेतकऱ्यांना याचा फायदा व्हावा हा उद्देश कृषी विज्ञान केंद्राचा राहणार आहे.

एस.आर. टी तंत्रज्ञान वापरून करत असलेल्या आधुनिक शेतीची पाहणी करण्यासाठी परदेशी पाहुणे चेरी टेन हे सिंगापूरहून तर एडम ब्लाईट ऑस्ट्रेलियाहून माळवाडी शिवारात दाखल झाले होते. त्यांच्याबरोबर सुहास जोशी या बायर कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेट दिली आणि माळवाडी गावचे तरुण प्रयोगशील आणि प्रगतशील शेतकरी किरण यादव यांच्या उत्पादनवाढीसाठी केलेल्या प्रयोगांचे कौतुक केले. या प्रसंगी केवीके बारामती येथील डॉक्टर संतोष भोसले आणि डॉ. विवेक भोईटे उपस्थित होते.