पुणे:- आता मागणारे हात न होता देणारे हात व्हा, असा सल्ला देत मागासवर्गीय उद्योजकांसाठी देण्यात येणाऱ्या ‘व्हेंचर कॅपिटल फंड’ योजनेसाठी सर्वोतोपरी मदत मी करीन असे आश्वासन सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्री रामदास आठवले यांनी दिले.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टडीज विभाग, २० मार्च फाउंडेशन आणि सावित्रीबाई फुले पुणे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने ‘आर्थिक समतेचे उद्धिष्ट आणि व्हेंचर कॅपिटल फंड फॉर शेड्युल कास्ट’ ही मागासवर्गातील पहिल्या पिढीच्या उद्योगांची परिषद भरविण्यात आली होती. यावेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, उपमहापौर सुनीता वाडेकर, ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ सुखदेव थोरात (ऑनलाइन पध्दतीने), व्यवस्थापन परिषद सदस्य राजेश पांडे, प्रसेनजीत फडणवीस, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टडीज विभागाचे प्रमुख डॉ. विजय खरे, डिक्कीचे अध्यक्ष मिलिंद कांबळे, आयआरएस अजय ढोके, २० मार्च फाऊंडेशनचे संस्थापक संचालक अविचल धिवार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष डॉ. सुनिल धिवार, संतोष मदने आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

अधिक वाचा  संभाजीराजेंची पुरती कोंडी?; राजेंच्या हाती केवळ काही तासचं?

अविचल धिवार यांनी प्रास्ताविकपर भाषणात ‘व्हेंचर कॅपिटल फंड फॉर शेड्युल कास्ट’ या योजनेतील त्रुटी दाखवत ही योजना अधिक चांगल्या प्रकारे राबविता येईल हे पुरावे देत सादरीकरण केले. तर अजय ढोके यांनी शासकीय योजनांमध्ये धोरण, त्याची अंमलबजावणी आणि त्यातील आवश्यक बदल याविषयी सविस्तर भाष्य केले.

मिलिंद कांबळे यांनी ज्याप्रमाणे व्हेंचर कॅपिटल फंड आहे त्याप्रमाणे मागासवर्गीय नउद्योजकांसाठी स्टार्टअप फंड द्यावा अशी मागणी केली.

यावेळी कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनीही चांगल्या संकल्पना घेऊन या त्याची सुरुवात नक्की केली जाईल असे आश्वासन दिले. तर राजेश पांडे यांनीही परिषदेच्या कामाचे कौतुक केले.

अधिक वाचा  मलिकांच्या अडचणीत वाढ, नवाब मलिकांचे डी-गँगशी संबंध' असल्याचं न्यायालयाचं निरीक्षण