पुणे : पुण्यात एका माध्यम समूहाच्या कार्यक्रमात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शरद पवार, सुशीलकुमार शिंदे यांचा उद्योजक म्हणून सत्कार करण्यात आला.

फडणवीस म्हणाले, कार्यक्रमात अशा राजकारणी आणि प्रसिद्ध उद्योगजक व्यक्तींचा माझ्या हस्ते सत्कार केला जातोय. याचा मला अभिमान वाटतो. राजकारणात अशी समृद्ध प्रक्रिया फक्त महाराष्ट्रातच पाहायला मिळते. पवारसाहेब, शिंदेसाहेब यांचे काम, कर्तुत्व महान असल्याचे म्हणत फडणवीस यांनी दोघांचे कौतुक केले.

कित्येक दिवसांनी पवार आणि फडणवीस एकाच व्यासपीठावर एकत्र आले होते. यावेळी सत्कार झाल्यावर फडणवीस यांनी शरद पवार आणि सुशीलकुमार शिंदे यांचे भरभरून कौतुक केले.

अधिक वाचा  शरद पवार यांच्याकडून राज ठाकरेंनी काहीतरी शिकायला हवं, बृजभूषण यांचा मनसेच्या आरोपानंतर टोला

फडणवीस आणि पवार खूप दिवसांनी एकाच व्यासपीठावर एकत्र आले होते. त्यातच फडणवीस यांच्या हस्ते पवारांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर फडणवीस यांच्या तोंडून भरभरून कौतूक ऐकून उपस्थितांनी टाळ्या वाजवून दादही दिली.