पुणे : गेले दोन दिवस असलेले ढगाळ हवामान, त्यामुळे वाढलेला उकाडा त्याचवेळी रात्रीच्या तापमानात झालेली मोठी वाढ यामुळे दिवसांबरोबर पुणेकरांना रात्रीही प्रचंड उकाडा जाणवतो आहे.

राज्यात रविवारी सर्वाधिक कमाल तापमान वर्धा येथे ४२.५ अंश सेल्सिअस नोंदविले गेले. सर्वात कमी किमान तापमान महाबळेश्वर येथे १८.६ अंश सेल्सिअस नोंदविले गेले होते. पुणे शहरात गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ हवामान आहे. शनिवारी शहरात कमाल व किमान तापमान ३८.८ आणि २१.८ अंश सेल्सिअस नोंदविले गेले होते.

त्यापासून काहीशी सुटका मिळण्याची शक्यता असून सोमवारी पुणे शहरात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. दिवस व रात्रीच्या तापमानातील फरक कमी झाल्याने अंगाची लाहीलाही होत असल्याचा अनुभव सध्या पुणेकर घेत आहेत.

अधिक वाचा  elecation Breaking : ..... तिथं निवडणुका घ्या! मराठवाडा, विदर्भाचा मार्ग मोकळा?

२७ व २८ एप्रिल रोजीही हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.