मुंबई – पुणे एक्स्प्रेस मार्गावरील बोरघाटात वाहनांची रांग लागली आहे. मुंबई पुणे एक्स्प्रेस मार्गावर नऊ वाहनांचा अपघात झाला होता. त्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. रविवार असल्यामुळे मुंबईबाहेर गेलेले मुंबईकर घराकडे परतत आहेत. खोपोली एक्झिटवर मल्टीव्हेईकलवर आठ कार आणि खाजगी बसचा अपघात झाला. मुंबईकडे येणाऱ्या मार्गावर वाहनांची रांग, सुमारे दोन ते तीन किलोमीटर वाहनांची रांग लागली आहे. यामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. वाहतूक पोलीस रस्ता मोकळा करण्याचं काम करत आहेत.

मुंबई – पुणे एक्स्प्रेस मार्गावर बोरघाटात खाजगी बस आणि नऊ वाहनांचा अपघात झाला आहे. यामुळे, मुंबईकडे येणारी वाहतुक विस्कळीत झाली असून सुमारे चार किलोमीटर वाहनांची रांग लागली आहे. रविवारी सायंकाळच्या सुमारास बोरघाटातील खोपोली एक्झिटजवळ भरधाव वाहनांचा अपघात झाला होता. यामुळे, मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या कार आणि खाजगी बसचा अपघात झाल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती. यामध्ये, खाजगी बसने कारला ठोकर दिली असून एकूण नऊ वाहनांचा अपघात झाला आहे. तर, सायंकाळच्या सुमारास झालेल्या या अपघातामुळे मुंबईकडे येणाऱ्या पर्यटकांच्या वाहनांची रांग लागली होती. अपघातानंतर झालेली वाहतूक कोंडी पोलिसांकडून व्यवस्थित करण्यात येत आहे.

अधिक वाचा  टेस्लाला श्याओमीच मोठं आव्हानं; स्वस्तात लाँच केली 700 किलोमीटर रेंजची इलेक्ट्रिक कार; किंमत फक्त..

यामुळे, बोरघाटात सुमारे तीन ते चार किलोमीटर वाहनांची रांग लागल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. तर, सुदैवाने या अपघातात कुणीही प्रवासी गंभीर जखमी झालेला नाही. दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच पोलीस, देवदूत, आयआरबी यंत्रणा आणि अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संघटनेचे सदस्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन वाहने बाजूला करण्यात आली. अपघातात किरकोळ जखमी झालेल्यांवर उपचार करण्यात येत आहेत.