मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवास्थानाबाहेर हनुमान चालिसाचे पठण करण्यासाठी आलेल्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्या घराबाहेर गांधळ घालणाऱ्या 16 शिवसैनिकांना अटक केली आहे. मुंबईतील खार येथील राणा दाम्पत्याच्या घरासमोर काल शिवसैनिकांनी मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी केली होती. त्यामुळे पोलिसांनी गोंधळ घालणाऱ्या शिवसैनिकांना आज अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या सर्व शिवसैनिकांना उद्या न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

राणा दाम्पत्याच्या घरामसोर मोठ्या संख्येने जमलेल्या शिवसैनिकांना रोखण्यासाठी पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त तैनात केला होता. परंतु, कोणत्याही परिस्थितीत मातोश्रीसमोर हनुमान चालिसाचे पठण करणारच यावर राणा दाम्पत्य ठाम होते. त्यामुळे शिवसैनिकही आक्रमक झाले होते. आक्रमक झालेल्या शिवसैनिकांनी बॅरिकेड्‌सवर चढून राणा यांच्या घरापुढे जोरदार घोषणाबाजी केली होती. या प्रकरणी पोलिसांनी शिवसैनिकांवर गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी दहा शिवसैनिकांना अटक केली होती. तर नुकतेच आणखी सहा शिवसैनिकांना अटक करण्यात आली आहे.

अधिक वाचा  बॉक्स ऑफिसवर ‘धर्मवीर’ नावाचं भगवं वादळ कायम, तीन दिवसांत जमवला 9.08 कोटींचा गल्ला