मुंबई : केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी हे काल धुळे शहर दौऱ्यावर होते. त्यांच्या उपस्थितीत काल विविध कार्यक्रम, प्रकल्पांचे उद्‌घाटने झाली. यावेळी त्यांनी धुळे जिल्ह्यातील रस्‍ते हे तीन वर्षात अमेरिकेच्‍या दर्जाचे असतील असे आश्वासन दिले आहे.

नितीन गडकरी म्हणाले, येणाऱ्या काळात मी धुळ्यातील टोल नाके बंद करून जीपीएस यंत्रणा उभी करणार आहे. त्यामुळे टोल न भरण्याचं टेन्शनच संपून जाईल. तसेच येत्‍या तीन-चार वर्षात नंदुरबार आणि धुळे जिल्‍ह्यातील रस्‍ते हे अमेरिकेच्‍या दर्जाचे असतील असे आश्‍वासनही नितीन गडकरी यांनी यावेळी दिले.

अधिक वाचा  ओबीसी आरक्षण भाजप-काँग्रेस यांच्यामुळंच गेलं; एकाच नाण्याच्या दोन बाजू - जानकर

यावेळी त्यांनी काही नेत्यांचे कान देखील टोचले. गडकरी म्हणाले, राजकारणात खोटी आश्वासन देऊन लोकांना मुर्ख बनवू शकत नाही. जे नेते खोटं स्वप्न दाखवतात त्‍यांच्‍याबद्दल तात्‍पुरतं प्रेम असतं आणि जे स्वप्न पूर्ण करून दाखवतात जनता त्यांच्यावर विश्वास ठेवते.

तसेच म्हणाले, धुळ्यात येताना माझं मन शांत होतं. कारण खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी जी कामं सांगितली होती ती कठीण होती. मात्र, सुलवाडे जामफल योजना पूर्ण झाली. या योजनेचं काम पूर्ण झाल्याने माझ्या डोक्यावरील ओझं कमी झाल्‍याचे देखील त्‍यांनी यावेळी बोलताना सांगितले.

धुळे शहरातील रस्त्यांच्या प्रस्तावावर बोलताना नितीन गडकरी यांनी खोचक टीका करत वक्तव्य केले की, धुळे शहरात कॉन्ट्रॅक्टरला ठेका दिला की तो दिवाळखोरीत जातो, त्यामुळे मला टेन्शन येते की ऑर्डर देऊनही कामे होत नाहीत. मात्र, आता हे काम पुन्हा सुरू झाले आहे त्यामुळे मला आनंद आहे.

अधिक वाचा  महाराष्ट्राची भूमी सर्वगुण संपुर्ण अनेकता हिच एकता हे मराठ्यांनी बिंबवलं. - राष्ट्रपती कोविंद

दरम्यान, नितीन गडकरी यांनी इलेक्ट्रिक वाहनांना अचानक आग लागल्याच्या घटना थांबवण्यासाठी संबंधित इलेक्ट्रिक वाहन कंपनींवर कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत. इलेक्ट्रिक वाहनांच्या सुरक्षेबाबतचे निकष कंपन्यांकडून पाळले गेले नसेल तर अशा कंपन्यांवर कडक कारवाई होणार आहे, असे त्यांनी सांगितले आहे.