बॉलिवूडचा प्रसिद्ध दिग्दर्शक करण जोहर सोशल मीडियावर अनेकदा कोणत्या ना कोणत्या कारणाने ट्रोल होतो. वैयक्तिक आयुष्यात करण जोहर खूप आनंदी आहे आणि तो ट्रोल करणाऱ्यांच्या बोलण्याकडे जास्त लक्ष देत नाही. निर्माता करण जोट्रोल्सला सामोरे जाण्यासाठी करण जोहर वापरतो ‘ही’ युक्ती; म्हणाला, माझ्या लैंगिकतेवर कमेंट करणाऱ्यांना मी…हर त्याच्या लैंगिकतेवरून अनेकदा ट्रोल झाला आहे. पण करणला द्वेष करणाऱ्यांचा काही फरक पडत नाही. अनेकवेळा करणनेच स्वतःची खिल्ली उडवणाऱ्या यूजर्सना सडेतोड उत्तर दिले आहे.

एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत करण जोहरने ट्रोलिंगवर भाष्य केले. करण जोहरने सांगितले की, सोशल मीडियामुळे तुम्हाला लोकांशी कनेक्ट होण्याची संधी मिळते. त्याचा कोणताही चित्रपट प्रदर्शित होणार असेल तर तो सोशल मीडियाचा जोरदार वापर करतो. करणने सांगितले की, त्याला खूप ट्रोल केले जाते, पण त्याला काही फरक पडत नाही.

अधिक वाचा  केंद्राचा मोठा निर्णय, १ जूनपासून साखरेच्या निर्यातीवर घातले निर्बंध

करण म्हणतो की, मी नकारात्मकतेची चिंता करणे सोडून दिले आहे. माझे लक्ष फक्त लोकांच्या प्रेमावर आहे. मी कमेंट सेक्शन स्कॅन करतो. मी फक्त त्या ठिकाणी पाहतो जिथे लोकांचे प्रेम आहे. माझ्या लैंगिकतेवर भाष्य करणे, मी काय करतो यावर बोलतात. मी मे मध्ये 50 वर्षांचा होईन आणि त्याबद्दल मी अत्यंत खुश आहे. ट्रोल्सशी सामना करण्याच्या त्याच्या फंड्यावर बोलताना करण जोहर म्हणाला की, मी ट्रोल्सना इंडायरेक्ट मैसेज करतो.

करण म्हणतो की “माझ्यावर प्रेम करा किंवा माझा तिरस्कार करा पण पण कृपा करून माझ्यावर नाराज राहू नका कारण ही गोष्ट मला मारून टाकू शकते. उदासीनता अशी गोष्ट आहे जी मी सहन करू शकत नाही.” करण जोहर त्याच्या आनंदी स्वभावासाठी आणि आनंदी वाइब्ससाठी चाहत्यांमध्ये प्रिय आहे.

अधिक वाचा  पुण्यात दिवसाढवळ्या सराफा व्यापाऱ्यावर सशस्त्र हल्ला

करण सोशल मीडियावर नेपोटिझमपासून ड्रेसिंग सेन्सपर्यंत अनेक गोष्टींसाठी ट्रोल झाला आहे. पण करण ज्या प्रकारे द्वेष करणाऱ्यांकडे दुर्लक्ष करतो आणि आयुष्यात आनंदी राहतो, ते कौतुकास्पद आहे. करण जोहर इतरांच्या आनंदातही सहभागी होत असतो. त्याने काही दिवसांपूर्वी आलिया आणि रणबीरच्या लग्नाला हजेरी लावून त्यांच्या आनंदात सहभागी झाला होता.

कभी खुशी कभी गम या चित्रपटाबद्दल बोलायचे झाले तर या चित्रपटात शाहरुख खान आणि अमिताभ बच्चन मुख्य भूमिकेत होते. याशिवाय जया बच्चन, काजोल, करीना कपूर आणि हृतिक रोशनही या चित्रपटात होते. हा चित्रपट 2001 साली आला होता आणि सुपरहिट ठरला होता. चित्रपटातील गाणी प्रेक्षकांना चांगलीच आवडली होती. आजही हा चित्रपट टीव्हीवर आला तर लोक तो पाहिल्याशिवाय राहू शकत नाहीत. हा करण जोहरच्या सर्वात यशस्वी चित्रपटांपैकी एक आहे.